Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा दुसरे अधिवेशन कुऱ्हे पानाचे येथे आयोजित करण्यात आले

Responsive Ad Here

   

     सत्यशोधक समाज संघाचे खान्देशातिल जळगाव जिल्ह्यातील गावागावात सत्यशोधक कार्यकरत्यांचा वारसा होता याचे आभ्यास पुर्व माहीती जे एस ऊगले पैठण यांनी त्याच्या संशोधनातुन मांडले,   शिक्षण,शेती ,नौकरी या बद्दल ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, सत्यशोधकांचा ध्वज फडकवुन या कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली,

या कार्यक्रमाचे उद्घाटक मा रावेर मतदार संघाचे लोकप्रियआमदार शिरीष चौधरी होते ,स्वागत अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत मध्ये डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी आपले मत मांडले .आज आम्ही अशा वर्गात अशा वर्गासमोर सत्यशोधक हा विचार ही सभ्यता घेऊन जात आहोत मांडत आहोत ज्या वर्गाची आज सर्व समस्या सुटलेली आहे .अर्थात एक हिंदी पिक्चर चे डायलॉग सारखे भगवान का दिया हुआ गाडी है बंगला है पैसा है सबकुछ है लेकिन उस फिल्म उस कलाकार को बिवी नही मिलती है । अर्थातच आज समाजामध्ये गाडी बंगला पैसा पेन्शन सर्व काही आहे फक्त दोन समस्या आहेत त्या समस्या  मुलीला नोकरीवाला मुलगा मिळाला पाहिजे आणि मुलाला नोकरी मिळाली पाहिजे अशा दोन समस्या आहेत.



     असा वर्गासमोर आम्ही सत्यशोधक हा विचार ही संस्कृती मांडण्याचा प्रयत्न करत आहोत . समाजात मुलाला नोकरी मिळाली तर दुसरी अपेक्षा  उंचावली आम्हाला मुलगी शिकलेली पाहिजे .आम्हाला मुलगी शिकलेली पाहिजे मुलगा नोकरीला पाहिजे मुलगी जर नोकरीला राहिली तर अति उत्तम या सर्व समाजामध्ये गोष्टी प्रस्थापित झाल्या या समाजाच्या प्रगती विकास साठी सत्यशोधकांनी फार मोठा त्याग करून संघर्ष करून समाजाला हे सर्व मिळवून दिले होते .मुलगी शिकलेली पाहिजे ही समस्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सोडवली या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून .त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी या देशांमध्ये इंग्रजांकडे आजचा मराठा OBC SC ST वर्ग आहे त्यासाठी प्रतिनिधीत्व मागितलं होतं प्रशासनामध्ये की आमची चौथी सातवी शिकलेली मुलं तुम्ही तहसीलमध्ये घ्या त्यांना तहसीलदार बनवा . जेणें करून प्रशासन स्तारावर शेतकरी यांना न्याय मिळेल .त्यानंतर जेव्हा सत्यशोधकाचे धुरा राजर्षी शाहू महाराजांनी स्वीकरली तेव्हा त्यांनी आपल्या संस्थेमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केला आहे अर्थात मुलाला नोकरी पाहिजे हा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी सोडवला आहे आणि पुढे जाऊन समस्त भारताला स्त्री आणि पुरुषांना शिक्षण आणि नोकरी शेवटचे सत्यशोधक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सोडवला हिंदू कोड बिलच्या माध्यमातून सोडवला .सत्यशोधक समाजाची स्थापना राष्ट्रपिता जोतीराव फुले सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आणि  राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी सत्यशोधक समाजाचा शेवटचा सत्यशोधक राहील .मी सत्यशोधक सोडणार नाही .अर्थात सत्यशोधकाच्या स्थापनेपासून तर बाबासाहेबांचा मी शेवटचा सत्यशोधक आहे इथपर्यंत या महान सत्यशोधकांनी समाजाचे प्रश्न सोडवले होते शिकलेले मुलगी पाहिजे हा सत्यशोधकाने प्रश्न सोडवला मुलगा नोकरीला पाहिजे यासाठी राजश्री शाहू महाराजांनी प्रतिनिधित्व दिले स्त्री पुरुष शिकलेली पाहिजे आणि दोघांना समानतेचा हक्क अधिकार पाहिजे प्रतिनिधी पाहिजे ही समस्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाला दिले आणि ते सर्व कमी जास्त प्रमाणामध्ये भारतीय समाजाला मिळाले म्हणून समाजामध्ये शिकलेली मुलगी पाहिजे मुलीला नोकरीवाला मुलगा पाहिजे मुलाला नोकरी लागली पाहिजे या सर्व समस्या सुटलेल्या होत्या परंतु आज या समस्या पुन्हा समाजासमोर येऊन ठेपले आहेत .या महान सत्यशोधकांच्या त्याग आणि समर्पणाने कार्यामुळे आज समाजाकडे गाडी बंगला पैसा सबकुछ है फक्त दोनच समस्या आहेत मुलाला नोकरी मिळाली पाहिजे आणि मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे .आज या समस्या निर्माण होण्याचे मूळ एकच कारण की ते आमच्या पूर्वजांनी सत्यशोधकाचा विचार घेऊन चालले होते त्यासाठी या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपवून संघर्ष केला होता ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला ज्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी संघर्ष केला  त्यांच्या संघर्षांना ते मिळालं म्हणून आज आमच्याकडे गाडी बंगला पैसा आहे .

     परंतु ज्यांच्यामुळे मिळालं ज्या सत्यशोधक विचारामुळे मिळालं ज्या सत्यशोधक संस्कृतीमध्ये मिळालं जे कार्यकर्ते त्यावेळेसचा समाज सत्यशोधकाला धरून चालला सत्यशोधकांच्या विचाराने चालला सत्यशोधकाच्या संस्कृतीने चालला परंतु आज आम्ही सर्व शिकलेले लोक आम्ही सत्यशोधकाचा विचार सोडला सत्यशोधक संस्कृती सोडली परिणाम या सर्वांचा आज आमच्या येऊन ठेपले आहेत आज मुलगा शिकलेला पाहिजे किंवा मुलगी शिकली पाहिजे ही समस्या नाही राहली . तो शिकून त्याला नोकरी आहे का ते सांगा अशी प्रगतशील समाजाची मान्यता आहे परंतु या व्यवस्थेने बघितले की या लोकांनी सत्यशोधकाचा विचार सत्यशोधकाची संस्कृती सोडून वैदिक संस्कृती स्वीकारली आहे परिणाम आज या व्यवस्थेने या महापुरुषांनी दिलेलं प्रतिनिधित्व शासनातला प्रशासनातला समाप्त करून टाकले आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ने फक्त जगण्यापुरता या महागाईमध्ये पैसा दिला जात आहे .आणि या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जेव्हा मुलगा काम करतोय तेव्हा मुली वाले विचारतात मुलगा कॉन्ट्राक मध्ये आहे का परमनंट आहे परमनंट नावाची व्यवस्था सत्यशोधकाने निर्माण केल्याने कॉन्ट्रॅक्ट नावाची व्यवस्था ज्यांनी हजार वर्षे आम्हाला गुलाम बनवलं होतं त्यांनी  पुन्हा निर्माण केली आहे .पुढे जाऊन जे शिक्षणाचा खाजगीकरण होत आहे याच्याने येणाऱ्या काळात कमी शिकलेला वर्ग मिळेल पुढे पुढे न शिकलेला मिळेल म्हणून पहिल्या टप्प्यात मुलाला नोकरी पाहिजे आणि मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे ही समस्या आहे पुढे जाऊन शिक्षणाचा प्रमाण कमी होईल आज लोकसंख्येच्या अनुपातामध्ये आमची शेती तुकड्या तुकड्यांमध्ये आमच्याकडे आहे म्हणून या सर्व गोष्टी बघितल्या तर व्यवस्था पुन्हा हजारो वर्षे मागे घेऊन जात आहे म्हणून सत्यशोधकाची संस्कृती सत्यशोधकाचा विचार जर अंगीकारला नाही समाजाने तर हे निश्चित होणार आहे म्हणून सत्यशोधकाचा समाजाचा विचार सत्यशोधकाची संस्कृती अंगीकारणे अनिवार्य आहे .राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा  त्या काळामध्ये टाटा जेवढं एका वर्षामध्ये उत्पन्न करायचे तेवढ्या उत्पन्नाचा टॅक्स राष्ट्रपिता ज्योतिराव फुले भरायचे .याच्यावरन लक्षात येतं की त्यांची श्रीमंती आणि त्यांच्या उद्योगाचा व्याप किती असेल .म्हणून सत्यशोधकाचे क्रांती एखाद्या झोपडी मधून होण्यापेक्षा ज्या सत्यशोधक समाजाच्या विचाराच्या आणि संस्कृतीच्या संघर्षामुळे गाडी बंगला पैसा मिळाला आहे अशा सदनवर्गांच्या घरातून ही क्रांती झाली तर समाज पुन्हा प्रगतीपथावर आल्याशिवाय राहणार नाही फुले गरीब होते म्हणून क्रांती केलेली नाही आहे . फुले श्रीमंत होते फुलेंना कळालं मान सन्मान समाजाची व्यथा त्यांच्याबरोबर झालेले प्रसंग आणि या समाजासाठी काय केलं पाहिजे हे श्रीमंत राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधकाचा विचार चालवला .

    शाहू महाराज गरीब होते म्हणून त्यांनी संघटना चालवली किंवा मोर्चा चालवला असं नाहीये समाजाच्या प्रती जो सत्यशोधकाचा विचाराचा भाव होता तो त्यांनी अंगीकारला आणि समाजाला दिले त्याच पद्धतीने बाबासाहेब जगातले विद्वान होते म्हणून नॉलेज राहिलं तर श्रीमंती आपोआप येते म्हणून त्यांनी सुद्धा ठरवलं असतं तेही फार मोठे उद्योगपती श्रीमंत राहिले असते पण त्यांनी सत्यशोधकाचे सभ्यता सत्यशोधकाचा विचार भारतीय मूळ संस्कृती रुजवण्याचा काम केलं त्याचे फलित समाजाला मिळालं आज त्या विचारापासून आम्ही दूर जात आहोत म्हणून आज आमच्या समस्या दोनच आहेत पुढे पुढे शिक्षण कमी होणार आणि पुढे पुढे जाऊन  जे पूर्वी जगत होतो त्या पद्धतीने आम्हाला जगण्यासाठी ही व्यवस्था भाग पाडेल . कारण या व्यवस्थेला आम्हाला जगवायचं सुद्धा आहे  तर त्यांच्या गरजा पूर्ण होतील आम्ही नाही जगलो तर हे व्यापार कोणाच्या जीवावर करणार ? आम्ही नाही जगलो तर यांच्या भाकड कथा कोणाच्या डोके मारतील ? आम्ही नाही जगलो तर यांना दक्षिणा कोण देणार ? म्हणून शिकलेल्या सदन वर्गाने झोपडीतून क्रांती होण्यापेक्षा आपल्या घरातूनच क्रांती झाली पाहिजे म्हणून सत्यशोधकाचा विचार आणि संतशोधकाची सभ्यता संस्कृती अंगीकारून ते वैभव कायम ठेवणे काळाची गरज आहे असे मत अध्यक्ष मनोगत मध्ये डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी मांडले .