Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे चंद्रकांत पाटील यांचा निषेध

Responsive Ad Here

जामनेर ( प्रतिनिधी ) 

जामनेर तालुक्यातील पहूर येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका जाहीर कार्यक्रमात महात्मा फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांबद्दल अपशब्द काढले या प्रकरणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले .


ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुकाध्यक्ष रवी मोरे यांनी तीव्र शब्दात चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली . यावेळी शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे गणेश तायडे यांनी मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी पहूर शहराध्यक्ष करण मोरे , संदीप सुरवाडे , स्वप्निल मोरे , विशाल मोरे , विशाल दाभाडे , भिवा मोरे , अजय मोरे , निलेश मोरे , सनी बागुल , सुनील वाघ , सुधाकर नरवाडे ,  किशोर मोरे , आदित्य हिवाळे ,   महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव शंकर भामेरे ,   अण्णासाहेब निकम ,  ईश्वर हिवाळे , तुषार बनकर , रोशन चौधरी  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते