Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लाबाना नायकडा समाज कुंभ स्थळाचे संतांच्या हस्ते भूमिपूजन..

Responsive Ad Here

जामनेर,प्रतिनिधी( गणेश पांढरे)

:-अखिल भारतीय गोर बंजारा लबाना नायकडा समाजाच्या महा कुंभ 2023 मेळावा आयोजित करण्यात आला असून आज  सकाळी-11 वाजता पोहरा देवीचे संत पूजनीय बाबूसिंग महाराज,संत गोपाल चैतन्य महाराज, कुंभाच्या संचालन समितीचे अध्यक्ष-संत श्याम चैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत कुंभ स्थळाच्या भूमीचे विधिवत मंत्रोच्चारात यज्ञ आहुती देऊन भूमी पूजन संपन्न झाले.

◆सविस्तर वृत्त असे की-गेले सहा महिने पासून जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी या कुंभ मेळ्याची जय्यत तयारी सुरु आहे.या कुंभ मेळ्याला देशभरातून विविध संत व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कुंभ मेळ्याची गरज काय.?

असा प्रश्न सारखा उपस्थित केला जात आहे देशात 2023 मध्ये जनगणना होणार आहे या जनगणने मध्ये देशातील हिंदूंची संख्या घटवण्याचे षडयंत्र सुरु आहे या जनगणने मध्ये बंजारा समाजाला लक्ष्य करून त्यांना धर्म या तक्ता मध्ये अदर नोंदणी करून देशातील हिंदू समाजात फुट पाडण्याचा कुटील डाव सुरु आहे.या कुंभ मेळ्यामध्ये बंजारा समाजाचे संत व धर्मजागरण विभाग जनजागृती करून जनगणनेत धर्म या रकाना मध्ये हिंदू असेच नमूद करावे.तसेच बंजारा समाजाला धर्मांतरित करण्याच षडयंत्र मोठ्या प्रमाणावर देशभरात सुरु आहे बंजारा समाज आजही तांडे-पाड्या वर राहत आहे त्यांच्या साधेपणाचा भोळ्याभाबड्या स्वभावाचा फायदा घेऊन ख्रिश्चन मिशनरी यांनी बंजारा बांधव यांना धर्मांतरित करण्याचे लक्ष्य आखले आहे.या कुंभ मेळ्यात बंजारा समाजाचा इतिहास समाजाचे या राष्ट्र निर्माण मधील योगदान बंजारा समाजाच्या संताचे हिंदू धर्मामधील योगदान बंजारा समाज किती वर्ष जुना आहे याचा इतिहास हा प्रदर्शनी मधून मांडून समाज जागरणाचे काम केले जाणार आहे.


कुंभ मेळा गोद्री मध्येच का.?

लबाना समाजामध्ये गुरुनानक संगत व बालाजी भगवान महाप्रसाद भंडारा आयोजित केला जातो त्याच प्रकारचा कार्यक्रम एकूणच सर्व बंजारा समाजाच्या विविध विविध भागांमध्ये केला जातो त्यामध्ये सांस्कृतिक धार्मिक गतिविधी ठिकाणी होऊन आपल्या पद्धतीने एकत्रीकरण केले जाते लबाना समाजातील साधुसंत व नायक कारभारी यांच्याशी चर्चा करून लबाना व नायकडा समाजाचे एकत्रीकरण व्हावे व समाजावर होणारे सांस्कृतिक धार्मिक आक्रमण थांबवणे हा मूळ हेतू आहे बंजारा समाजाचे मूळ हे दोन्ही समाजातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्या करिता हा कुंभ गोद्री येथे ठेवण्यात आला सदर कार्यक्रम हा दोन टप्प्यामध्ये होत असून प्रमुख गोद्री येथे कुंभ स्थळ इथून 3km अंतरावर फत्तेपूर येथे होत आहे कुंभाचे अध्यक्ष निमंत्रक म्हणून बंजारा समाजाची काशी पोहरादेवी महाराज संत पूजनीय बाबू सिंग महाराज त्यांच्यासोबत वृंदावन धाम पाल येथील गोपाल चैतन्य महाराज संत रामसिंग महाराज संत सुरेश महाराज संत गुलाब महाराज व बंजारा लबाना नायकडा समाजाचे सर्व संत कुंभाचे निमंत्रक म्हणून काम पाहत आहेतत.

विरोधकांकडून अशी पण चर्चा होत आहे प्रति पोहरादेवी निर्माण करण्याचा प्रयत्न आर.एस. एस.व बि.जे.पी.करत आहे परंतु मी स्वतः आपल्याला सांगत आहे की लबाना समाजामध्ये अशा प्रकारचे संगत भंडारे करत असतात,त्या प्रमाणेच हा एक भंडारा आहे त्याला लागून कुंभ येथे होत आहे कुंभाच्या निमित्ताने समाजाला जागृत करण्यासाठी कुंभाचे आयोजन व नियोजन संपूर्ण बंजारा लबाना नायकडा समाजाचे कार्यकर्ते व संचलन समिती अहोरात्र करत आहे

                                                             

विरोधकांना पोहरादेवी चे महत्व जर पटत असेल तर त्यांनी एकच गोष्ट स्पष्ट करावी कि पोहरादेवी येथील विकास कामासाठी मंजूर झालेला निधी गेले अडीच वर्ष सरकार का देऊ शकले नाही आज समाज सर्व मतभेद विसरून एका छताखाली एकत्र येत आहे तर कोणाला यात वाईट वाटण्याचे कारण नाही या वेळी काही प्रश्न उपस्थित केले त्यात 1) पोहरादेवी विकासाचे काम अडीच वर्ष का रखडले ? 2) विरोधक सत्तेत असताना वनविभागाकडून मंजुरी का नाकारण्यात आली? 3) "व्हि.जे.एन.टी" अर्थात बंजारा समाजाला पदोन्नतीचे आरक्षण देणे हे असंवैधानिक आहे आणि ते मिळू नये यासाठी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र लिहून देणारे कोण? 4) स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत 'गोद्री कुंभमेळ्याला विरोध करणाऱ्यांनी पोहरागडाला किती निधी दिला ? या कार्यक्रमांमध्ये भाजपा आर.एस.एस. च नाहीतर जो बंजारा समाजाच्या धर्महिताच तसेच प्रीतीचा विचार करणाऱ्या संघटना कोणतीही व्यक्ती व पक्ष संघटना व अशा राष्ट्रभक्तांचा या कुंभामध्ये हार्दिक स्वागत असेल संपूर्ण देशामधील कोणतीही धार्मिक राजकीय अराजकीय राष्ट्रप्रेमी संघटना या कुंभात येऊन सेवा देऊ शकते.या कुंभा तर्फे सर्व पक्षांना तसेच सर्व धार्मिक संघटनांना निमंत्रण गेली आहे येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागतच आहे या कुंभामध्ये संत योगी जी महाराज हे मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित नसून ते नाथपंथाचे महाराज आहे तसेच बंजारा समाज मधील अनेक लोक नाथ पंथीय आहे त्यामुळे मा योगीजी येथे येणार आहे.सदर कार्यक्रम मध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांना भाषण करायची संधी नाही या कुंभ मेळ्या मध्ये सर्व संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतील कुंभ मेळ्यास संत महंत  पुज्य गुरू शरणाआनंदजी महाराज वृदावन, पुज्य गोविंदगिरी महाराज रामजन्मभुमी न्यास,दिदी मा.साध्वी ऋतंभरा देवी,पुज्य महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद इन्दोर,पुज्य अखीलेश्वराजी जबलपूर,महा मंडलेश्वर विश्वेश्वराआनंदजी मुंबई,

 महंत रघुमणीजी(वडा उदासिन आखाडा), बाबा हरनामसिंगजी(पंजाब) दमदमी टकसाळ, पुज्य संत मुरारी बापु,माता अमृतनंद मयी,पुज्य भास्करगीरी महाराज देवगड,पुज्य महांडलेश्वर जनार्दन स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून शेवटच्या दिवशी सर्व पक्षीय नेते तसेच मुख्यमंत्री ना.योगी आदित्यनाथ,ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या सह अनेक पदाधिकारी ज्येष्ठ,श्रेष्ठ मंडळी उपस्थित राहणार असल्याचे गोद्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संचालन समितीचे अध्यक्ष-शाम चैतन्य महाराज यांनी माहिती दिली