जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत हॉलमध्ये सालाबादप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील माजी उपसरपंच रवींद्र मोरे शिवसेना नेते गणेश पांढरे उपसरपंच श्याम सावळे अबु तडवी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख संदीप बेढे भारत पाटील चेतन रोकडे गया तडवी ईका पैलवान बंडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी राजधर पांढरे रामेश्वर पाटील गणेश पांढरे बंडू पाटील रवींद्र मोरे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारत पाटील तर आभार चेतन रोकडे यांनी मानले यावेळी ठेकेदार सलीम भाई ग्रामपंचायत कर्मचारी अमोल दौगे दीपक बारी यांच्यासह ग्रामस्थ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
