जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे दिनांक 25 ते 30 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नाय कडा कुंभमेळा होत आहे या कुंभाची सर्व व्यवस्थाची 80 ते 90 टक्के तयारी पूर्ण झाली आहे धर्मस्थळ कुंभ स्थळ निवास व्यवस्था वाहन तळ भोजन व्यवस्था इत्यादी व्यवस्था पूर्ण होत आल्या आहेत या सहा दिवशी कुंभ सोहळ्यात विविध राष्ट्रीय संत व महात्मे व साधुसंत भाविक यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या कुंभ सोहळ्यात साधारण दहा लाख भाविक येणार असल्याचा अंदाज आहे तसेच 26 जानेवारी रोजी कुंभ स्थळी ध्वजारोहण होणार आहे अशी माहिती गोद्री सेवा समितीचे अध्यक्ष श्यामजी चैतन्य महाराज यांनी गोद्री येथे आयोजित पत्रकार परिषद ही माहिती दिली
हिंदू गोर बंजारा व लबाना नाय कडा समाज कुंभ मेळावा तयारीला वेग आला असून भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगराची निर्मिती करण्यात आली आहे त्यामध्ये 50 हजार निवासी व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच दिवसभरात कुंभ मेळाव्या येणाऱ्या दीड लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासाठी भोजन तयार करण्यासाठी सात मोठी स्वयंपाक घरी उभारण्यात आली आहेत या कुंभमेळा दाखल होणाऱ्या भाविकांसाठी अन्न क्षेत्रात भोजनाची व्यवस्था असणार आहे कुंभ स्थळी मुख्य सभा मंडपाच्या समोरील बाजूस ही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे
त्या दररोज दीड लाख पेक्षा अधिक भाविक दिवसभरात भोजन करतील अशी अवस्था करण्यात आली आहे सहादिवशीय कुंभ सोहळ्यासाठी देशभरातून विविध राष्ट्रीय संत साधुसंत राजकीय नेते मंत्री तसेच विशेष अतिथी येणार आहे येणाऱ्या प्रमुख पाहुण्याच्या सोयीसाठी चार हेलिपॅड ची उभारणी करण्यात येत आहे कुंभ मेळाव्यासाठी तेलंगाना आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून सुमारे दहा लाख भाविक येणार आहे त्यांच्या सोयीसाठी सात नगराची व्यवस्था करण्यात आली आहे एक स्वतंत्र नगर महिलांसाठी असणार आहे तसेच अडीच ते तीन हजार महिलांसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या नगरात मंडपात निवास व्यवस्था स्नानगृहे साकारण्यात येत आहे आधुनिक पद्धतीच्या शौचालयासाठी उभारणी करण्यात आली आहे
अडीचशे एकर मंडपातील कुंभ मेळाव्यात सहा डोम व 90 संत कुटिया उभारण्याचे काम सुरू आहे त्या सभागृहाचा डोम जर्मन हॅगर उज्जैन येथून येणार आहे कुंभमेळ्यात सभा मंडपा चा हा मुख्य डोम असणार आहे या ठिकाणी विशेष मान्यवर येणार असल्याने त्या दृष्टिकोनातून उभारणी करण्यात येत आहे
#धार्मिक स्थळी गुरुद्वाराचा लंगर कडून होणार अन्नदान#
धार्मिक स्थळे गुरुदाराच्या लंगर कडून होणारा अन्नदान बचत गटाच्या स्टाईलची उभारणी या ठिकाणी होणार आहे बचत गटासाठी जागा देण्यात येणार असून दोनशे बचत गट आपल्या विहित वस्तू प्रदर्शन लावणार आहे धार्मिक स्थळी मंदिराच्या मागच्या बाजूला केंद्रीय कार्यालय असणार आहे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी अमृतसर नांदेड येथील गुरुद्वाराच्या माध्यमातून भाविकांसाठी प्रसादाचे लंगर लावण्यात येणार आहे कुंभमेळ्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे
#मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार#
ज्या गोद्री गावात कुंभ सोहळा होत आहे ते पूज्य धोंडीराम बाबा आणि आचार्य चंद्र बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे व त्याचा गुरुनानक देवजी यांच्याशी संबंधित मोठा इतिहास आहे त्यामुळे पुन्हा दरम्यान लबाना समाजातील श्रद्धास्थान असलेले पुज्य धोंडीराम बाबा व आचार्य चंद्र बाबा यांच्या मंदिरासाठी गोद्री येथे उभारणी झालेली असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे
