जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे शेंदुर्णी येथील तरुणाची गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की शेंदुर्णी येथील किरण खंडू माळी वय 32 या यु वक याने येथील ख्वाजा नगर लगत येथीलअमोल देवदास कुमावत यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतमालक अमोल कुमावत हे गुरांचे शेणपाणी करण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना गळफास घेतलेला तरुण आढळून आला
तात्काळ पोलिसांना खबर देऊन या घटनेची माहिती दिली पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाचा मृत्यूदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शेव इच्छेदन साठी पाठवण्यात आला असून अमोल कुमावत यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास बीट अंमलदार भरत लिंगायत हे करीत आहे
.jpg)