जिल्हा प्रतिनिधी जळगाव
जळगाव - जळगाव चे तहसीलदार श्री नामदेव पाटील व एस. आय. ओ. श्री. डी. बी. जाधव हे संगनमताने भ्रष्टाचार करीत आहे . असा आरोप करत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा संघटक शैलेश सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिलेले आहे . सदर निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे , शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेची प्रक्रिया तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्वतंत्र खोली मध्ये सुरू करणेसाठी , शैलेश सपकाळे यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी लेखी अर्ज सादर केला होता . सदर अर्ज तहसिलदार श्री.नामदेव पाटील यांनी पुढील कारवाईसाठी पुरवठा अधिकारी श्री. डी.बी.पाटील यांचेकडे स्वाक्षरी करून दिला असून त्या कारवाईस आज सुमारे १ वर्ष पूर्ण होत आहे .
तरी सुद्धा एकाही नागरिकांचे शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी कोणतीही कायदेशीर व्यवस्था सुरू करण्यात आलेली नसून जनतेची लूटमार सुरू झालेली आहे. यापूर्वी शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी ५००/- ते ७००/- रूपये मोजावे लागत होते त्याऐवजी सद्यस्थितीत १५००/- ते २०००/- रूपये मोजावे लागत आहे. त्यासाठी धरणगाव व अमळनेर येथे नागरिकांना स्वत: जावे लागत आहे. असा अंधाधुंद व गलथान कारभार सुरू आहे. शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी नागरिकांना धरणगाव व अमळनेर येथे का जावे लागत आहे ? याची प्रत्यक्ष तहसिलदार श्री.नामदेव पाटील व पुरवठा अधिकारी डी.बी.जाधव या दोघी भ्रष्टाचारी अधिकारी यांना बोलावून त्यांचेकडे कसून चौकशी करावी. धरणगाव येथे शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेचा आदेश हा कोणी कोणत्या अधिकारी किंवा मंत्री महोदय यांनी दिला आहे ? याची चौकशी करणे गरजेचे आहे.
या गंभीर घटने मागे कोणाचा वरदहस्त आहे , याचा कसून तपास करणे गरजेचे आहे. तसेच जळगाव येथील तहसिल कार्यालयामध्ये दिवसा ढवळ्या खुले आमपणे तेथील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या दलालांमार्फत बेकायदशीर कामे करीत आहे , या विषयी पूर्वीच लेखी तक्रारी अर्ज सादर केला असून सुद्धा आजपावेतो कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. कारण तेथील तहसिलदार श्री.नामदेव पाटील हेच सर्वस्वी जबाबदार असून भ्रष्टाचारामुळे बेकायदेशीर कामे करीत असलेचे स्पष्ट दिसून येत आहे. अश्या भ्रष्टाचारी तहसिलदार यांचेकडून गरीब जनतेस योग्य न्याय कसा मिळणार आहे? या मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करून संबंधीत भ्रष्टाचारी तहसिलदार श्री.नामदेव पाटील यांचे विरूद्ध जनतेची फसवणूक करणे विषयी योग्य ती फौजदारी कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी अश्या भ्रष्टाचारी अधिकारी विरूद्ध कायदेशीरपणे वेळीच योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी . उडवाउडवीची व टाळाटाळीचे उत्तरे दिल्यास जळगाव येथील तहसिल कार्यालयातील अधिकारी यांचे विरूद्ध औरंगाबाद खंडपीठा मध्ये कायदेशीरपणे याचिका दाखल करणेची तजवीज ठेवली आहे. असा इशारा देखील शैलेश सपकाळे यांनी दिलेला आहे.
.jpg)