परभणी येथून दोन्ही आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले पोलिसांवर दगडफेक करीत रिवाल्हर हिसकावून चा आरोपींकडून प्रयत्न
जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील 14 जानेवारी रोजी पहूर येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे आपली ड्युटी बजावत असताना पहुर बस स्थानकावर आरोपी फिरोज शेख सुपडू शेख व त्याचा साथीदार खाजा तडवी यांची मोटर
सायकल मध्यम भागी रोडवर उभी असल्यामुळे मोटर सायकल बाजूला घे असा राग आल्यामुळे आरोपी यांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना मारहाण करून अनिल सुरवाडे यांना डोक्याला व हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार ते दाखल केले आहे त्या दिवसापासून आरोपी फिरोज शेख सुपडू शेख व खाजा तडवी हे फरार होते या घटनेमुळे पहुर येथील बस स्थानकातील अतिक्रमण पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी संपुर्ण अतिक्रमण हटवून महामार्गाव रस्ते मोकळे करण्यात आले आहे
गेल्या पाच दिवसापासून तपासी अधिकारी पीएसआय अमोल गजै आरोपीच्या मागावर होते सुमारे 1000 मोबाईल पेक्षा जास्त तांत्रिक लोकेशन करून आरोपी यांचा मार्ग काढून काल रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास मराठवाड्यातील जिल्हा परभणी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर एका जंगलामध्ये आरोपी लपून बसले होते आरोपींना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गजै व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप ज्ञानेश्वर ठाकरे ईश्वर कोकणे यांनी आरोपी यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपी यांनी पोलिसांवरच दगडफेक करून पोलिसांना खुसकावण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मोठ्या हिमतीने त्यांना पकडले असता आरोपी खाजा तडवी याने या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे रिवाल्वर हिसकावून याचा प्रयत्न केला पोलिसांनी मोठ्या हिमतीने दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले
आज मध्यरात्री दोन्ही आरोपींना पहूर पोलीस ठाण्यात अटक केली आहे या दोन्ही आरोपींना आज जामनेर न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार असून पोलीस तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गजै व सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप ज्ञानेश्वर ढाकरे ईश्वर कोकणे यांचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अभिनंदन केले आहे
.jpg)