Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिथे साक्षात विष्णूचा वास अशा त्रिविक्रम नगरीला कोटी कोटी नमन.: श्री लोकेशानंदजी महाराज.

Responsive Ad Here



भागवत कथेच्या पाचव्या दिवशी महिलांची लक्षणीय उपस्थिती. "ज्याचे दारी गाय त्याचे त्याचे घरी विठोबाचे पाय".

उत्कृष्ट नियोजनाचे परिसरातून होतआहे कौतुक.

 जामनेर प्रतिनिधी(गणेश पांढरे) 

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे भागवत कथा गाय ही श्रद्धेचे प्रतीक, धर्माचे स्वरूप आहे. गाईचे पूजेचे महत्व अगाध आहे .गायीचे रक्षण करा ती संपली तर पूजा कशाची करणार?तिच्यापासून दूध तर मिळतेच पण तिच्या गोबर चे गौरी करून तिच्या स्वयंपाकासाठी उपयोग होतो. त्यापासून बनणारी राखही भांडे घासण्यासाठी कामात येते .असे सांगत नारायण भक्ती पंथाचे प्रवर्तक श्री लोकेशनंदजी महाराज यांनी आपल्या भागवत कथेची सुरुवात केली.

   नारायण परीक्षेत्र ओळखता आले पाहिजे. ज्या ठिकाणी विष्णूचा वास आहे .अशा त्रिविक्रम नगरीला मी कोटी कोटी वंदन करतो. येथे राहणारे खूप भाग्यवान आहे.इथे कोणत्या ना कोणत्या कारणाने येणारे व निवास करणाऱ्यांनी चांगलेच काही केले पाहिजे. ही विष्णूची पंढरी काहीही करून वाढलीच पाहिजे. त्यासाठी काही करावयाचे असल्यास सर्वांनी होकार भरायलाच हवा. असेही आव्हान त्यांनी यावेळी भाविकांना केले त्रिविक्रम साक्षात चतुर्भुज नारायण आहे. लहान मंदिर असून चालणार नाही. भगवंताचे वैभव वाढविणे हे भक्ताचे कर्तव्य आहे. असा काही निर्णय झाला तर आपला होकारच असावा असावा.

    21 फेब्रुवारीला विष्णू प्रयाग यज्ञ ची शहादा येथील आमंत्रणही त्यांनी यावेळी भाविक भक्तांना दिले .साधू संतांच्या क्रोधातही कृपा लपलेली असते, गुरु मानायचे परंतु गुरुची गोष्ट ऐकायची नाही हे काही बरे नाही,

 मोठमोठ्या लढाईचा अंत काही चांगला झाला नाही. कोर्टात मोठे मोठे खटले अजूनही सुरूच आहे. समझोता करणाराच हा सुखी होतो .यावेळी त्यांनी असेही सांगितले की मनाला पकडून ठेवणे. त्याला एकाग्र करणे .सगळ्यात कठीण काम आहे. एका वेळेस राजांनी संताला हिणवले की तुम्ही माळा जपतात काय मोठे काम करतात. तुमच्यापेक्षा दगड फोडणारे चांगले .यावेळी संतांनी सांगितले की दगड फोडणाऱ्याला बोलवा व एक तास माळा जपायला सांगा शेवटी  दगड फोडणाऱ्या मजुराला बोलावल्या गेले व मनाची एकाग्रता करून र नाम जप करणे त्याला एक तास ही कठीण झाले .जो आपल्या कामात ,भक्तीत, व्यवसायात, ध्येयात मन एकाग्र करून काम करेल तोच जीवनात यशस्वी होईल, हा जीवनाचा सार त्यांनी भाविकांना सांगितला.

  जिनके हाथो मे प्रभू राम का जाम है !

उनके जीवन मे आराम ही आराम है!

  आनंदला विरोधाअर्थी शब्द कोणताही नाही. मात्र त्याच्या वरचे शब्द भरपूर आहे. जसे परमानंद, ब्रह्मानंद ,पूर्णानंद, म्हणून भगवंताचे ही नाव सच्चिदानंद आहे .म्हणूनच आनंदात जीवन व्यतीत करा, कोणत्याही छोट्या मोठ्या कारणाने व्यथित चिंतित राहू नका ,भगवंत भक्तीचा ध्यास करा, परमेश्वर सगळे काही सुरळीत करून देईल ,त्याचे वर नितांत श्रद्धा ठेवा.

  आज भागवत कथेच्या पाचव्या दिवशी 21 जोडप्या कडून आरती करण्यात आली. आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचा महाराजांनी ही कौतुक केले व त्याचा लाभ भाविक भक्तांना होत आहे.