जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे 14 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहा च्या सुमारास फतेपूर येथील औट पोस्ट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे निकाल मध्ये रात्री नाईट ड्युटीवर असताना पहुर बस स्थानकावर ड्युटी बजावत असताना रोडवर मध्यम भागी असलेल्या मोटरसायकल स्वार याला गाडी साईटला लाव असे सांगितले असता याचा राग येऊन अनिल सुरवाडे यांच्यावर येथील शेख फिरोज शेख सुपडू याने अनिल सुरवाडे यांच्यावर हल्ला केला यात अनिल सुरवाडे गंभीर जखमी झाले
पहूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहेत अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला मार लागला असून तर हात फक्चर झाले आहे त्याच्यासोबत असलेला वाहनचालक रवींद्र मोरे यांनाही धमकवण्यात आले असून मध्यरात्री राडा झाल्याने काही काळ तणावग्रस्त दृश्य निर्माण झाले होते
पोलीस कर्मचारी रवींद्र रूपचंद मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख फिरोज शेख सुपडू व खाजा तडवी राहणार पहूर या दोघां विरोधात पहूर पोलीस ठाण्यात 353 333 332 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेरात्री राडा झाल्यामुळे आज सकाळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पहुर बस स्थानकात असलेलें सर्व अतिक्रमण काढण्यात आले असूनपोलिसांवर हल्ला झाल्याने पहुर गुंडगिरी वाढली असून अशा समाजकंटकाला त्वरित आळा घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे
