Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूरला पत्रकार दिना निमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

 मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन एक दिवस अगोदरच पत्रकार दिनानिमित्त पहूर येथे शहर पत्रकार संघटनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . आज दि . ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महात्मा फुले शिक्षण  संस्था संचलित डॉ .हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सदर स्पर्धा घेण्यात आली . स्पर्धेत  पहूर केंद्रातील आर . टी . लेले  हायस्कूल , आर . बी . आर . कन्या विद्यालय , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय , डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय ,  जिल्हा परिषद मराठी मुला -मुलींची  शाळा मधील सुमारे ३९५  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . 

यशस्वीतेसाठी सुनिता पाटील ,  सरोजीनी  वानखेडे , युनूस तडवी ,अमोल क्षीरसागर , गिरीष भामेरे , हरीभाऊ राऊत , प्रकाश जोशी  यांच्यासह शहर पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे गणेश पांढरे,अध्यक्ष रवींद्र घोलप, उपाध्यक्ष किरण जाधव, मनोज जोशी, सादीक शेख, रवींद्र लाठे, , शरद बेलपत्रे,जयंता जोशी, डॉक्टर संभाजी क्षिरसागर, प्रविण कुमावत आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले . समन्वयक म्हणून संघटनेचे सचिव शंकर भामेरे यांनी काम पाहीले