![]() | ||
| लोकजागर मंच च्या हळदी कुंकू समारंभात सासु सुनेच्या नात्यावर प्रेरणादायी व्याख्यान* |
हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया
हिवरखेड शहरातील हजारावर महिलांच्या उपस्थितीत काही काळ एकमेकींची ख्याली खुशाली समजुन घेण्यासाठी लोकजागर मंच्याच्या वतीने भव्य हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता या कौटुंबिक सोहळ्यात प्रख्यात प्रेरणादायी वक्ते प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी सासु सुनेच्या नात्यावर धमाल उडवून देणारे प्रेरणादायी व्याख्यान केले.
परिवारामध्ये महिलांचे स्थान काय आहे महिलांनी आपले संपूर्ण जीवन हसत खेळत कसे काढायचे याबाबत एक प्रकारे जीवन जगण्याची कला प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानातून करून दिली. सदर समारंभात ज्या सासु सुना उपस्थित होत्या त्यांना हंकारे यांनी आपसात एकमेकींना मिठी घ्यायला लावून सासु सुनेचे नाते प्रेमळ ठेवण्याचा संदेश दिला.
यावेळी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की. महिलांचे बचत गट असोत अथवा अन्य संस्था, संघटन असो या सर्वांना सोबत घेऊन महिलांच्या आर्थिक उन्नतीबरोबरच त्यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी लोकजागर मंच कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून वसंत हंकारे होते.ह्या समारंभात एक हजाराच्या वर महिला सहभागी झाल्या होत्या .यावेळी गप्पांची मैफल, लांबलचक उखाणे आणि लज्जतदार अल्पोपहाराने या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली होती. हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वान भेट स्वरूपात देण्यात आले.गायक आणि संगीतकार विलास अरबट व त्यांच्या चमूने आणि आर्या संतोष गावंडे ह्या बालिकेने बहारदार गीत सादरीकरण करून हजारो श्रोत्यांची मने जिंकली.
4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हिवरखेड येथील जि.प. प्राथमिक शाळेत लोकजागर मंच द्वारे हळदी कुंकवाचा हा अविस्मरणीय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत मनीष भुडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल भड यांनी तर प्रास्ताविक महेंद्र कराळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकजागर मंच च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी हजारावर महिलांनी सुखी संसाराचे सूत्र आत्मसात करून घराकडे प्रयाण केले.
