जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथील आर टी लेले महाविद्यालयाचे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात पार पडला महाविद्यालयातील दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय तर्फे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील पत्रकार गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य सलीम मौलाना आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी राजधर पांढरे रामेश्वर पाटील गणेश पांढरे शाळेचे प्रवेक्षक एस व्ही पाटीलआदींनी मनोगत व्यक्त केले शाळेच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते
