जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.मनीषा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेचा शुभारंभ जामनेर नगरी च्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने लार्ड गणेशा स्कुल येथे करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी जामनेर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल शेठ,डॉ.संदीप पाटील,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.सतीश चौधरी,डॉ.नरेंद्र राका,डॉ.प्रशांत पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,लॉर्ड गणेशा स्कुल चे विजय मोरे,सतिष मोरे,मीनल पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,डॉ.मनोज पाटील,डॉ.मनोज तेली,शाळा तपासणी पथक,समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्तीत होते.
तालुक्यात एकूण २०७ शासकीय शाळा,३५अनुदानीत शाळा,१४ खाजगी शाळा,३९६ अंगणवाडी केंद्र,९ खाजगी नर्सरी केंद्रातील एकूण ११४४३१ बालकांची आरोग्य तपासणी एकूण ४२ पथकद्वारे करण्यात येणार असल्याचे तसेच शून्य ते अठरा वर्षापर्यंत ची बालके व किशोरवयीन मुले मुली यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करून त्यांच्यातील जल्मजात विकृती,कोणत्याही कारणामुळे आलेले व्यंग,आजार व शरीरातील कमतरता यांचा शोध घेऊन त्यांना पुढील संदर्भ सेवा देण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिनार चंदनाणी यांनी केले तर आभार रवींद्र सूर्यवंशी यांनी मानले .डॉ.चंद्रमनी सुरवाडे व डॉ.स्वाती विसपुते यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.डॉ.विजया पाटील,डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.धनंजय पाटील,डॉ.निलेश चव्हाण,डॉ.कविता काळे,डॉ.अनिता राठोड,डॉ.हर्षाली गोसावी,डॉ.पंकज पाटील,गोपाळ पाटील,मनोज परदेशी,हेमंत पाटील,स्वप्नील महाजन,धीरज पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले.
