जामनेर प्रतिनिधी
पहुर मार्गे दिल्ली येथून मुंबई कडे जाणारा अशोक लेलँड कंटेनर सह ६०लाख रुपयांचा गुटखा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई आज दि.२०रोजी पहाटे ५वाजेच्या सुमारास करण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील यांना मध्य प्रदेश मार्गाने महाराष्ट्रात गुटका येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पोलिस पथक पाठवून आज दि.२०रोजी पहाटे५वाजेच्या सुमारास जामनेर रस्त्यावर सोनाळे फाट्यावर अशोक लेलँड कंटेनरसह ६०लाख रुपये किमती चा गुटखा पकडला.
अशोक लेलँड क्रमांक एच.आर.४७डी.९८५६या वाहनाचा चालक शराफत अली हसन महम्मद(वय३०)रा.चहलका तहसील तावडू जिल्हा नुहु राज्य हरयाणा, वाहन मालक इम्रान खान शाहबुद्दीन घसेरा रा.पलवल,राज्य हरयाणा, गोलु(मँनेजर) नाव गाव माहीत नाही,गुटखा मालक राजु भाटिया या चौघांनी संगनमत करून महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांनाही स्वताच्या आर्थिक फायद्या साठी दिलबाग प्लस पान मसाला, ए प्लस तंबाखू, सुंगधित तंबाखू व सुपारी दिल्ली राज्यातून महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे विक्रीसाठी जात असतांना पकडण्यात आला. या प्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात गु.र.नं.८०/२०२३भा.दं.वि.कलम ३२८,२७२,२७३,१८८,१०३प्रमाणे दाखल करण्यात आला. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापु रोहोम,ए.एस.आय.रवींद्र ईश्वर शिलावट,बशीर गुलाब तडवी, पोलिस नाईक प्रमोद सोनु मंडळीक, मनोज अशोक दुसाने यांच्या पथकाने केली. या कारवाई मुळे गुटखा व्यावसायिकात घबराट पसरली आहे.
