जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे आज सकाळी पहुर बस स्टॅन्ड परिसरात सवाद्य मिरवणूक काढून जोरदार स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात फलकाचे अनावरण करून मिरवणुकीची सांगता झाली
भारत मुक्ती मोर्चा तथा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत ओबीसी जनगणनेसाठी व खाजगीकरणाच्या विरोधासाठी इ व्हि एम हटाव देश बचाव परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे परिवर्तन यात्रा जात असताना या यात्रेचे स्वागत येथील उपसरपंच श्याम सावळे माजी उपसरपंच रवींद्र मोरे माजी शिवसेना शहरप्रमुख सुकलाल बारी शिवसेना प्रवक्ते गणेश पांढरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्या आघाडी तालुका अध्यक्ष राजु जंटलमेन ग्रामपंचायत पंचायत सदस्य शरद पांढरे रवींद्र पांढरे दिलीप पांढरे विजय देशमुख ज्ञानेश्वर घोलप किरण मोरे सतीश जगताप फिरोज तडवी शहर प्रमुख संजय तायडे भाऊराव गोंधनखेडे बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष राजू खरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

