" जि.प.शिक्षक बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्याकडे जमीर रजा यांची मागणी "
असलम परवेज:लोणार
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांसाठीच्या झालेल्या टप्पा क्र.६ मध्ये तांत्रिक चुक निर्माण झाल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाले आहे. याबाबत दिनांक 6 मार्च 2023 रोजी एका निवेदनाद्वारे सदर चूक दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही बदलीपात्र शिक्षकांनी प्रशासकीय मध्ये “मला बदली नको” हा पर्याय निवडून अर्ज भरला होता. अशा शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांची जागा इतर शिक्षकांना मिळाली नाही असे शिक्षक आपल्या शाळेवर सुरक्षित राहिलेले आहेत.
मात्र अशा शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांच्या जागा इतर शिक्षकांना मिळालेल्या आहेत असे सर्व शिक्षक त्याच शाळेवर आज रोजी TAGGED दाखवत आहेत. वास्तविक पाहता बदलीपात्र शिक्षकांचा हा शेवटचा टप्पा होता म्हणून अशा शिक्षकांना ह्याच टप्प्यात त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळांवर बदली मिळणे आवश्यक होते. आज रोजी असे शिक्षक आपल्या जुन्या शाळेवरच टॅग झालेले(TAGGED) म्हणून अतिरिक्त दाखवत आहेत. ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्यसचिव शेख ज़मीर रज़ा यांनी एका निवेदनाद्वारे जि.प.शिक्षक बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.
प्रतिक्रिया:
"बुलढाणा जि.प. मध्ये जि.प.उर्दू उच्च प्राथमिक शाळा, टुनकी बु. पं.स.संग्रामपूर मधील भाषा विषय शिक्षक इक्बाल अहमद खान जाबिर खान यांनी प्रशासकीय मध्ये अर्ज केला होता व आज रोजी ते TAGGED झालेले असून आपल्या शाळेवर अतिरिक्त दाखवत आहे. अशीच चूक पूर्ण राज्यात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही." शेख ज़मीर रज़ा राज्यसचिव,अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना
