Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्यासाठी घंटानाद आंदोलन नायब तहसीलदारांची भेट ; आंदोलन स्थगित करण्याचे पत्र

Responsive Ad Here



जामनेर ( प्रतिनिधी )

    जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील  वाघुर नदीच्या तीरावरील सार्वजनिक स्मशानभूमीलगत होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे ,या मागणीसाठी वाघुर विकास आघाडी आणि शिवसेनेतर्फे आयोजित घंटानाद आंदोलन मागे घेण्यात यावे असे पत्र गायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांनी आंदोलकांना दिले . आज  आंदोलनाचा दुसरा दिवस होता . नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांनी आंदोलन स्थळी  येऊन आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या . यावेळी त्यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमी येथे भेट देऊन अतिक्रमण विषयी माहिती जाणून घेतली . भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे मोजणी केल्यानंतर निश्चित करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल , तथापि आंदोलन मागे घेण्यात यावे ,असे त्यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे . 

नायब  तहसीलदारांनी स्मशान भूमी लगत होणाऱ्या अतिक्रमणाची प्रत्यक्ष पाहणी केली . यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते . 

वाघुर विकास आघाडीचे सुकलाल बारी , शिवसेनेचे अशोक जाधव , शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे , सुधाकर शिंगारे ,  सतीश बारी , एकनाथ बारी , शांताराम बारी , अमृत बारी , मंगेश बारी , शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे ,  भाऊराव गोंधनखेडे ,  यांच्यासह असंख्य ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत . माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , डॉ. मनोहर पाटील , उपसरपंच श्याम सावळे ,  माजी  उपसरपंच रवींद्र मोरे , , संतोष चिंचोले एडवोकेट एस आर पाटील समाजसेवक प्रफुल लोढा आर टी लेले शाळेचे मुख्याध्यापक आर बी पाटील सरआदींनी आंदोलन स्थळी भेट दिली .

  .