Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आकांक्षा ग्रामसंघ यांनी जागतिक जल दिन व गुढीपाडवा पुस्तकांची गुढी उभारून केला साजरा

Responsive Ad Here

पुस्तकांची गुढी उभारून सक्षम व वैचारिक बुद्धिमत्तेचा परिचय – डॉ. मयूर लहाने


प्रतिनीधी हिवरखेड जितेश कारिया 

        भारत सरकार द्वारा पुरस्कृत नेहरू युवा केंद्र अकोला जिल्हा कार्यालय व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला तर्फे आयोजित जागतिक जल दिन व गुढी पाडवा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा करिता आकांक्षा ग्रामसंघ मधील सर्व महिला बचत गट यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड ता तेल्हारा जि अकोला व आकांक्षा ग्रामसंघ  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक जल दिन युवा व गुढीपाडवा मंडळाच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पुस्तकांची गुढी उभारून व जल संपत्ती त्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.  

        कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सौ. वैष्णवी मयूर लहाने अध्यक्ष आकांक्षा ग्रामसंघ हिवरखेड यांनी भूषविले. तसेच सौ.     नीलिमा बाजारे सचिव आकांक्षा ग्रामसंघ, सौ. उज्वला अमोल नेरकर आयसीआरपी उमेद अभियान, व ग्रामसंघ कोषाध्यक्ष सौ. आंबेकर यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली. जागतिक जल दिन व गुढीपाडवा निमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. मयूर बंडू लहाने अशासकीय सदस्य, जिल्हा मराठी भाषा समिती अकोला यांनी ग्रामसंघाच्या कौतुकास्पद निर्णयाचे स्वागत केले. पुस्तकांची गुढी उभारून सक्षम व वैचारिक बुद्धिमत्तेचा परिचय या ग्राम संघाने घडवून आणला. तसेच जल संपत्तीचे पूजन ही सुद्धा उल्लेखनीय बाब या ठिकाणी दिसून आली. स्त्रीया सक्षम असतील तर घर सक्षम असेल. असे ते या वेळी म्हणाले. जलसंधारणासाठी लोकांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबवणे व शैक्षणिक उद्धार व्हावा हा महिलांचा उद्देश दिसून आला. 

        या कार्यक्रमाकरिता विविध बचत गटाच्या महिला प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी तसेच माता भगिनी व विद्यार्थिनी या उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वीते सौ. उज्वला अमोल नेरकर आयसीआरपी उमेद अभियान व त्यांचे सहकारी, आकांक्षा ग्रामसंघ यांचे सर्व पदाधिकारी, सौ. नलिनीताई लहाने व आकांक्षा युवा मंडळ चे सर्व पदाधिकारी व सर्व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन आकांक्षा ग्राम संघ हिवरखेड व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उज्वला अमोल नेरकर यांनी केले