Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलढाणा जिल्ह्यातील PFMS प्रणालीद्वारे अनेक शाळांची सन 2021-22 ची व्यपगत झालेली दीड कोटी रुपयाची निधी परत द्या.

Responsive Ad Here

                                        "शेख जमीर रजा, राज्य सचिव अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना यांचा पाठपुरावा"


असलम परवेज:लोणार प्रतिनिधी

बुलढाणा- समग्र शिक्षा, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान या लेखाशिर्षांतर्गत मागील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये PFMS प्रणालीद्वारे जिल्ह्यातील १५५४ शाळांसाठी एकूण एकंदर रुपये २६९०७५००/- (दोन कोटी एकोणसत्तर लक्ष सात हजार पाचशे रुपये) प्राप्त झाले होते. मात्र पहिल्यांदाच शाळांसाठी लागू केलेल्या PFMS प्रणाली मधील तांत्रिक अडचणी व बँकेकडून PPA प्रमाणे संबंधित वेंडर च्या खात्यामध्ये रक्कम जमा न झाल्यामुळे तसेच काही शाळांचे पंचायत समिती कडून पुरविण्यात आलेल्या युझरनेम वरून शेवट पर्यंत खाते सक्रीय न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचा निधी व्यपगत झाला होता. 


           तत्कालीन प्रा.शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी एकूण व्यपगत झालेला निधी रुपये १४४९३८०२/- (अक्षरी- एक कोटी चौरेचाळीस लक्ष त्र्यान्नव हजार आठशे दोन रुपये ) परत उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर अहवाल राज्य प्रकल्प संचालक, मुंबई यांच्याकडे सादर केलेला आहे. मात्र अद्याप हा निधी प्राप्त झालेला नाही. तसेच २०२१-२२ मध्ये मुख्याध्यापकांनी संयुक्त शाळा अनुदानाचा निधी स्वतः जवळून खर्च केलेला असल्याने हा निधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.  तरी प्रलंबित संयुक्त शाळा अनुदान उपलब्ध करून  देण्याची मागणी करण्यात आली आहे.