Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत ची मुदत संपुष्टात प्रशासकाची नियुक्ती

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत सोमवारी संपुष्टात आली यात पहुर पेठ शहापूर कापुसवाडी सामोरोद टाकळी यासारख्या मोठ्या व राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे मुदत संपली असली तरी  निवडणूका  न झाल्यामुळे सोमवार पासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे

जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत संपली आहे त्यामुळे सोमवारपासून या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे जामनेर पंचायत समिती तर्फे संबंधित ग्रामपंचायतींना प्रशासक नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे पहूर पेठ शहापूर सामोरोद कापूस वाडी या भाजपाच्या ताब्यातील मोठ्या ग्रामपंचायत समावेश आहे या वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ग्रामपंचायत मतदार संघातून काही उमेदवार निवडणूक लढत आहे त्यांच्यासाठी मुदत संपल्या ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान करा धरले जाणार का किंवा नाही याबाबत काही सदस्य साशंक आहेत असे असले तरी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यावेळी असलेले ग्रामपंचायत सदस्य मतदार म्हणून पात्र असतील अशी मत तज्ञांनी व्यक्त केले आहे या गावाचा समावेश टाकळी बुद्रुक नांद्रा हवेली सवत खेडा गोड खेल गारखेडा खडकी तोरणाळा सामरोद पहुर पेठ एकुलती बुद्रुक नवी दाभाडी शहापूर गोरनाळे दोद

वाडे पठार तांडा पठार तांडा शिंगायत कापूस वाडी या गावातील ग्रामपंचायतची मुदत संपली आहे या ठिकाणी प्रशासक नियुक्ती झाली आहेजामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पहुर पेठ गावाची ग्रामपंचायत ची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपुष्टात आले असून प्रशासक म्हणून जामनेर पंचायत समिती शाखा अभियंता जी व्हि  पाटील यांची नियुक्ती झाली आहे

येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप शिवसेना असा तिरंगी सामना या निवडणुकीत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असणार त्यासाठी शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे गणेश पांढरे सुकलाल बारी आदी नेते शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी अत्यंत मेहनत घेत असून यावेळेस शिवसेनाच बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे