Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षण संचालक, कार्यालय पुणे येथे 3 मे रोजी धरणे आंदोलन

Responsive Ad Here


असलम परवेज

सिल्लोड:  वेतन अधिक्षक आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केली असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी पुणे येथे प्रत्यक्ष केले होते. त्याची दखल घेत शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे, शरद गोसावी यांनी एका पत्राद्वारे सर्व प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे औरंगाबद विभागीय उपसंचालक (प्राथमिक) अनिल साबळे यांना दिनांक 16 मार्च रोजी आदेश दिले होते परंतु 1 महिन्यांहून जास्त कालावधी होऊन सुद्धा अद्यापही कोणतीही कारवाई झालेली दिसून आली नाही. याबाबत संबंधितांना स्मरण सुद्धा करून देण्यात आले तरीही कारवाही करण्यात आली नाही.

          म्हणून नाईलाजास्तव  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनतर्फे न्याय व हक्कांसाठी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे कार्यालयासमोर येत्या 3 मे 2023 रोजी कार्यालयीन वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी दिली आहे.  



        विशेष म्हणजे या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र भरातील विविध शैक्षणिक संघटनांकडून समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे. आजपर्यंत एकूण 15 शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने लेखी समर्थन दिले आहे. सर्व समर्थनपत्र ही शिक्षण संचालक प्राथमिक कार्यालय येथे सादर करण्यात आले आहे.