Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बाकी वीस रुपयाचे काय

Responsive Ad Here


हिवरखेदड प्रतिनीधी जीतेश कारीया

मानवतेचा जयजयकार करणारा समाज उभा करायला ज्यांचे साहित्य मोठा हातभार लावते असे मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार बाबाराव मुसळे. नानांची आज बेलखेड ता. तेल्हारा येथे आयोजित वऱ्हाडी कट्टा साहित्य संमेलनात भेट झाली, संवाद झाला. विनम्रतेचा झरा अन ज्ञानाचा सागर असलेल्या नानांनी ही भेट हृदयाच्या कप्प्यात घर करणारी ठरली.

इयत्ता सहावी ला बाकी वीस रुपयाचे काय? हा नानांचा पाठ आहे. हा पाठ वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतांना संवेदनशीलता व प्रामाणिकपणा या मूल्यांची रुजवात यातील राजू या पात्रातून होते. त्यातील आशय विश्लेषण करतांना संवेदनशील समाज निर्माण करायला  मोठा आनंद तर वाटतोच सोबत आदर्श समाज निर्मितीसाठी पोषक हातभार आतापर्यंत मला झालेला आहे.

मा. बाबाराव मुसळे यांच्या वऱ्हाडी बोली साहित्याने जनसामान्याच्या मनात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङमय निर्मितीचे पुरस्कार त्यांच्या साहित्य कृतीला प्राप्त झाले आहेत. हाल्या हाल्या दुधू दे ही त्यांची पहिली गाजलेली कादंबरी. त्यानंतर त्यांनी कादंबरी, कथा या साहित्य प्रकारात उत्कृष्ट लेखन केले आहे. ज्यातून ग्रामीण जीवनानुभव व मानवतेच्या विचारधारेची पेरणी होते. मनाचा ठाव घेणाऱ्या थोर लेखकाची ही भेट मनाला ऊर्जावान करणारी अशीच ठरली.