Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ताजनगर भागात दोन गटात तुंबळ हाणामारी चाकू व लोखंडी पाईपचा सर्रास वापर; दोघे गंभीर जखमी

Responsive Ad Here



मलकापूर ताजनगर, पारपेठ भागातील शेजारी राहणाऱ्या दोन गटात इलेक्ट्रीक खांबाच्या कारणावरून झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी होऊन यात सर्रासपणे चाकू व लोखंडी पाईपचा वापर केला गेल्याने दोन जण गंभीर जखमी तर तिघे जखमी झाल्याची घटना १९ एप्रिलच्या रात्री ८ वाजे दरम्यान घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, , शहरातील पारपेठ भागातील ताजनगर परिसरातील इलेक्ट्रीक कारणावरून वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही गटाकडून चार ते पाच जणांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. यामध्ये चाकूचा व लोखंडी पाईपचाही सर्रासपणे वापर करण्यात आला.

यामध्ये जावेद व अकरम यांचेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहम्मद आरीफ मोहम्मद रज्जाक (वय ३४), मो. शरीफ अ. रज्जाक (वय २८), शे. मोबीन शे. नबू (वय ४०), शेख राजमोहम्मद (वय ३६), अ. अजीज | अ. कलीम (वय ३४) सर्व रा. ताजनगर मलकापूर यांचेवर चाकू व लोखंडी पाईपाने हल्ला करीत त्यांना जखमी केले.जखमींना स्थानिक कोलते हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यावेळी मोहम्मद आरीफ खांबाच्या मोहम्मद रज्जाक, मो. शरीफ अ. रज्जाक है दोघे गंभीर जखमी असल्याने जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे रेफर करण्यात आले असल्याचे कळाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसांची कारवाई सुरू होती