Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाशीमचे सुपुत्र अमोल गोरे यांना वीरमरण, दोन सहकाऱ्यांना वाचवले

Responsive Ad Here

   


    वाशीम : भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश येथील कमेंग व्हाली येथे अमोल तानाजी गोरे व त्याचे दोन सहकारी गस्तीवर असताना बर्फात दबले. पोहण्यात पारंगत असलेले अमोल गोरे यांनी जीवाची पर्वा न करता दोन सहकारी जवानांना सुखरूप वाचवले. मात्र, त्यांना वीरमरण आले. त्यांचे मूळ गाव सोनखास येथे उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेले वाशीम तालुक्यातील सोनखास येथील अमोल गोरे ३३ वर्षे हे १४ एप्रिल २०२३ कमेंग व्हाली येथे गस्तीवर असताना त्यांचे दोन सहकारी बर्फ, पाण्यात दबले. क्षणाचाही विचार न करता अमोल गोरे यांनी जीवाची बाजी लावत आपल्या दोन सहकारी जवानांना सुखरूप वाचवले. मात्र या प्रयत्नात त्याला वीरमरण आले. अरुणाचल प्रदेशमध्ये वापरी यांग बुंग नाला इस्ट कामिंग येथे ते देशसेवेत कार्यरत होते. त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव सोनखास येथे आणले जाणार असून उद्या सकाळी १० वाजे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमोल गोरे हे सैन्यदलात नायक पदावर कार्यरत होते. ते २६ मार्च २०११ मध्ये देशसेवेत दाखल झाले होते. विशेष म्हणजे, ते याच महिन्यात २५ एप्रिल रोजी सुट्टीवर येणार होते.