Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावणार - शेख जमीर रजा

Responsive Ad Here


असलम परवेज;बुलढाणा


बुलढाणा- अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांनी शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १२ एप्रिल २०२३ रोजी जि.प. बुलढाणा येथे शिक्षणाधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित तक्रार निवारण सभा आयोजित केली होती. या सभेत अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने विविध शैक्षणिक समस्या मांडून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.

          या वेळी संघटनेच्या शिष्टमंडळात राज्यसचिव शेख जमीर रजा, राज्य उपाध्यक्ष जाफर पटेल सरकार, विभागीय सहसचिव रियाज अहमद, जिल्हाध्यक्ष सय्यद अनीस सह हुसैन कुरेशी, शेख मोबीन, शाहिद हुसैन, शेख नूरुद्दीन, सय्यद रिजवान, वसीम असद आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

          दिलेल्या निवेदनामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून केंद्रप्रमुखांची अनेक पदे रिक्त असून हे पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली आहे . तसेच उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची एकूण 47 पदे मंजूर असून या पैकी फक्त 15 ठिकाणी उच्चश्रेणी मुख्याध्यापक कार्यरत असून 32 शाळा उच्चश्रेणी मुख्याध्यापकांपासून वंचित असल्याने ह्या रिक्त पदांची टक्केवारी 68% एवढी आहे म्हणून ही पदे तात्काळ पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही करावी व ही प्रक्रिया नवीन शिक्षणसेवक भरती पूर्वी करावी जेणेकरून जिल्ह्याला 32 जास्त शिक्षणसेवक पद मिळतील, असे निवेदनाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

                                         

    या सोबतच गोपनीय अहवाल वेळेवर जमा करून जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांचे सर्व रिक्त पदांसाठी समुपदेशन घेण्यात यावे. असे केल्याने एकाच वेळी 100% रिक्त पदे भरली जाऊ शकेल. याव्यतिरिक्त शिक्षणसेवकांचे नियमित वेतनश्रेणी साठीचे प्रस्ताव मंजूर करणे, शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे, माहे मार्च आणि एप्रिल चे पगार रमजान ईद पूर्वी करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे, बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना बॅन पदांसह सर्व रिक्त जागांवर पदस्थापना देणे, जीपीएफ मागणीचे प्रस्ताव मंजूर करणे अशा विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. 

         या सर्व समस्यांचे शासन दरबारी पाठपुरावा करून तात्काळ सोडविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पदवीधर आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांनी शिक्षक संघटनेशी बोलताना व्यक्त केली.