हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खु र.नं.ई ६०७ व्दारा आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे गत १७ वर्षापासून यशस्वी आयोजन श्रीसंत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे करण्यात येते. याही वर्षी दि १ मे ला एकादशीच्या शुभपर्वकाळावर श्रीसंत वासुदेवजी महाराज यांच्या विधिवत अभिषेक करुन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल .व दि.२० मे ला शिबिर समारोप राहील.तरी इच्छुकांनी आपल्या पाल्यांना आणुन प्रवेश द्यावा असे श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी कळविले.

