नांदुरा
नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राजेश एकडे गटाने १८ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला, तर माजी आमदार चैनसुख संचेती गटाला ५ जागांवर समाधान मानावे लागले.त्यामध्ये व्यापारी मतदारसंघात संचेती गटाचे मनोज राठी - १०४, गिरीश नवगजे- ७३ विजयी झाले. हमाल मापारी मतदारसंघांमध्ये संचेती गटाचे संजय फणसे-२७२, तर एकडे गटाचे प्रमोद गायकवाड यांना-१४९ मते मिळाली.
ग्रामपंचायत मतदारसंघात एकडे गटाचे संदीप बोचरे - २२७, संदीप भगत २२७, विजय प्रवीण भिडे १९५, पुरुषोत्तम झाल्टे २५८ विजयी झाले, तर याच मतदारसंघात संचेती गटाचे एकनाथ गावंडे १५७, सोपान चोपडे १५७, मधुकर तायडे १६७, सुनील जुनारे-२४९ पराभूत झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात ३५ मतदान अवैध झाले पुरुषोत्तम झाल्टे यांचा ९ मतांनी विजयी झाला. ओबीसी मतदारसंघातून एकडे गटाचे विलास पाटील २९९ मते विजयी, तर संचेती गटाचे नीलकंठ भगत यांना २१७ मते मिळाली. अनुसूचित जमाती मतदारसंघातून एकडे गटाचे भानुदास तितरे -२६९ मते घेऊन विजयी, तर संचेती गटाचे साहेबराव फासे यांना २४२ मते मिळाली. सोसायटी मतदारसंघात एकडे गटाचे प्रथमच गौरव पाटील हे ३२१ अशी सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले.
