जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे नवीन विद्यार्थी प्रवेश व स्वागत यासाठी शाळा पूर्व तयारी मेळावा जि प केंद्र शाळा पहूर पेठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे रामेश्वर पाटील, हस्ते संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद तायडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र खोडपे यांनी केले. यावेळी भारत पाटील श्रीमती मंगल म्हेत्रे, अश्विनी जाधव आगनवाडी सेविका सुषमा चव्हाण वंदना खेरनार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ग्रे मू. सुनंदा साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार गणेश राऊत मानले.
.jpg)
