हिवरखेड प्रतिनिधी जितेश करिया
हिवरखेड येथील सेंट पॉल येथे दिनांक 2 मे 2023 पासून विद्यार्थ्यांकरिता संस्कृत वर्कशॉप चे आयोजन निशुल्क करण्यात आले आहे. सेंट पॉल अकॅडमीचे प्राचार्य श्री चंद्रकांतजी तिवारी हे या संस्कृत शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना , संस्कृत भाषेची माहिती , व संस्कृत श्लोक आदींचे मार्गदर्शन करणार आहेत. फक्त 50 विद्यार्थ्यांना संस्कृत अभ्यासिकेत प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे असे आवाहन श्री तिवारी सर यांनी केले आहे.
आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात मुलांचा सर्व वेळ हा शाळा व ट्युशन क्लासेस मध्ये जातो.. उरलेला वेळ मुले घरी मोबाईल मध्ये घालावीतात. अशा स्थितीत प्राचीन संस्कृती दुरावित आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकरिता श्री. चंद्रकांतजी तिवारी , यांनी आपल्या कल्पनेतून लयबद्ध व स्वरबद्ध अशा संस्कृत वर्कशॉप चे आयोजन केले आहे. आओ संस्कृत सीखे , या संकल्पनेतून वर्ग तिसरी ते वर्ग आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकरिता जीवनातील अतिशय उपयोगी व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्या करिता संस्कृत वर्कशॉप अभ्यासिकीचे निशुल्क आयोजन 15 दिवसांकरिता करण्यात आले आहे.
बाल वयात मुलांमध्ये धर्म व संस्कृती चे संस्कार बनावे , शिस्त बनावी यासाठी प्राचार्य श्री चंद्रकांतजी तिवारी यांनी, विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी , व तो संस्कारक्षम बालक घडावा याकरिता या संस्कृत वर्कशॉप चे आयोजन केले असल्याचे मनोगत व्यक्त केले.

