Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सतत चा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Responsive Ad Here


प्रतिनीधी हिवरखेड जितेश कारीया 

 हिवरखेड आणि आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत रोजच वादळी वाऱ्यासह, विजेचा जोरदार कडकडाट आणि मेघगर्जना सह अवकाळी पाऊस  रोजच बरसत आहे. काल रविवारी पुन्हा   आक्रमक गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे  प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी सकाळ सोबत बोलताना विविध शेतकऱ्यांन्नी शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई ची मागणी व्यक्त केली जोरदार गारपिटीमुळे अनेकांची तारांबळ उडाली


 रात्रंदिवस मेहनत केल्याने व पिकांची काळजी घेतल्याने माझ्या शेतात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात बहरले होते. पण वादळी वाऱ्यांसह सततच्या अवकाळी पावसाने व गारपीटीने आमच्या तोंडचा घास हिरावला आणि संपूर्ण पिक भुईसपाट  केले. त्यामुळे माझ्यासह बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सर्व्हे करून आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी--सुनील निंबोकर शेतकरी हिवरखेड.