Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये सेंटपॉल अकॅडमीला प्रथम क्रमांक प्राप्त

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया 


 कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने  जागतिक डान्स दिना निमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये सेंटपॉल अकॅडमीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून दोन पारितोषिके यामध्ये सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड यांनी प्राप्त केलेली असून बेस्ट परफॉर्मन्स (खुला गट) त्याच बरोबर उत्कृष्ट नृत्य सादरीकरणासाठी हे पारितोषिक देण्यात आले. राज्यातील 102 शाळांनी या मध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह, नागपूर येथे करण्यात आले होते. 


या  कार्यक्रमाला सडक व परिवहन मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी सर व प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यl उपस्थितीत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये भूमी पिसोळे,आरुषी देशमुख, आस्था सिसोदिया,पायल राजनकार,ईश्वरी गावंडे, आरोही हनवते,किमया हनवते,आराध्या राजनकार,रुद्र घुगड,तुषार गावंडे,क्रिश शर्मा,आराध्या कवळकर या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला सहभाग घेतला या संपूर्ण  कार्यक्रमाची तयारी अमित पवार सर,अनिकेत गडे, दीपक सर,अंकुश अमांनकर सर यांनी या विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली.  विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनीतजी लखोटीया ,संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरंजी डागा  संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक  शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी  यांनी शुभेच्छा दिल्या