जामनेर प्रतिनिधी
जामनेर पंचायत समितीच्या सभागृहात पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर संपन्न मान्यवरांच्या हस्ते पूर्ण श्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एम काळे दिवाणी न्यायाधीश जामनेर हे होते विधी सेवा प्राधिकरणाच्या टीमने ज्यामध्ये एडवोकेट पीजी शुक्ला एडवोकेट नानासाहेब शिवाजीराव सोनार एडवोकेट श्री अनिल सारस्वत ऍडव्होकेट श्री बी एम चौधरी साहेब यांनी महिलांना कायदेविषयक बाबी व समस्या सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले तसेच जे के चव्हाण साहेब नवलसिंग भरतसिंग पाटील माजी सभापती पंचायत समिती जामनेर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले
सदर कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सौ संगमित्रा सोनार बालविकास प्रकल्प अधिकारी जामनेर एक यांनी प्रास्ताविकातून सांगितले समस्याग्रस्त पीडीत महिला व स्थानिक प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आजचा हा मंच आहे संवाद साधण्याचे व समस्या निराकरण करण्याचे हे व्यासपीठ आहे असे सोनार यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केले आजच्या कार्यक्रमात तालुका पातळीवरील सर्व अधिकारी उपस्थित होते योजनांची माहिती देणारे समस्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी विभागनिहायस्टाल लावले होते पंचायत समिती जामनेर तहसील कार्यालय विधी सेवा प्राधिकरण आरोग्य विभाग पोलीस विभाग शिक्षण विभाग कृषी विभाग आयसीडीएस विभाग या सर्व विभागांनी आपल्या खात्यांच्या योजना समजावून सांगणे त्या संबंधित अडचणींचा निपटारा करणे लोकांचे शंका समाधान करणे हे महत्त्वाचे काम आजच्या कार्यक्रमात झाले या कार्यक्रमात 415 महिलांनी सहभाग घेतला व 185 तक्रार अर्ज प्राप्त झाले शासन आपल्या दारी लोकशाही दिनावरच्या धरतीवरचा हा कार्यक्रम माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत व तहसीलदार नानासाहेब आगळे व गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या बहुमोल मार्गदर्शन आणि संपन्न झाला तसेच श्रीमती पुष्पा धनगर मॅम बालविकास प्रकल्प अधिकारी जामनेर 2 सौ सोनार एस एस बालविकास प्रकल्प अधिकारी जामनेर एक श्रीमती रीता भंगाळे मॅडम संरक्षण अधिकारी जामनेर 2 श्रीमती जया नाईक श्रीमती गोकर्ण वाकोडे श्रीमती शोभा पाटील श्रीमती शीला पाटील पर्यवेक्षिका तसेच चौधरी भाऊसाहेब व तडवी भाऊसाहेब व जाहिद अली भाऊसाहेबव व राजू माळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शीला पाटील पर्यवेक्षिका यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती शोभा पाटील पर्यवेक्षिका यांनी समर्पक रित्या केले
