हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया
इमारत चिरकाल टिकण्यासाठी तिचा पाया मजबूत असणे महत्त्वाचे असते. त्या वास्तूचे अत्याचार , भ्रष्टाचार आणि दुराचार रूपी उन , पाऊस आणि वारा यांच्या उपद्रवा पासून संरक्षण होण्यासाठी तिचा आधारस्तंभ हा सदाचारी असावा आणि त्या करिता तो बालपणापासूनच संस्कारीत असणे गरजेचे आहे. कारण बालसंस्कार शिबिर हे भारताचे भावी आधारस्तंभ निर्मितीचा कारखाना असल्याचे गौरवोद्गार हिवरखेड कर्तव्य दक्ष ठाणेदार श्रीयुत विजयजी चव्हाण यांनी काढले.
ते आज श्री ज्ञानभास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाशजी गावंडे हे होते यावेळी प्रेस क्लब हिवरखेड चे सदस्य बहूसंख्येने उपस्थित होते. तसेच श्री हरिदास पाटील वाघ यांचा कृषी उत्पन्न बाजार
समितीचे संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल श्री कीरण सेदानी,श्यामशील भोपळे,मनिष भुडके यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री ह भ प शिवाजी महाराज टाले, श्री सुरेशजी नाठे, विजयजी सेदाणी, महेंन्द्र बुद्धदेव, नटवरलाल पुरोहित, नटवरलाल वसानी,मनिषजी भुडके,रितेश टिलावत,लक्ष्मण हिवराळे,संजय शेंडे, सुनिल बजाज हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक संस्थाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले तर सुत्र संचालन श्री महेश महाराज मते यांनी केले असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.
