"बुलढाणा जिल्हा टीमच्या वतीने एम.ए.गफ्फार यांचा विशेष जंगी सत्कार"
असलम परवेज
|बुलढाणा| महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक तथा राज्य अध्यक्ष तसेच जि.प. उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.ए.गफ्फार यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा दि. ०४ मे २०२३ रोजी उर्दू घर देगलूर नाका रोड नांदेड येथे अनेक नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार विक्रम काळे, नामवंत शिक्षण तंज्ञ डॉ. अब्दुल करीम सालार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमर राजुरकर सह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, सर्व संघटनाचे पदाधिकारी सोबतच अनेक नामवंत व्यक्तिमत्वाची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनाचे महाराष्ट्रभरातून सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सेवापुर्ती कार्यगौरव कार्यक्रमात एम.ए. गफ्फार यांचा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बुलढाणाच्या वतीने विशेष जंगी सत्कार करण्यात आला. याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची विशेष टीम बुलढाण्याच्या वेगवेगळ्या शहरामधून नांदेड येथे दाखल झाली होते. या मध्ये राज्य सहसचिव वासिक नावेद, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद तन्वीर अहमद, सदस्य जावेद खान, अब्दुल सईद, रजा अहेमद खान, इम्रान सर, महमूद सर, जलील अर्शद, नईम सर, एडवोकेट मतीन तालिब, इत्यादींचा समावेश होता. सर्वांनी त्यांच्या दिर्घ आयुष्य व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या.
यावेळी शानदार उर्दू मुशायरा आयोजित करण्यात आला होता. याकरिता महाराष्ट्रभरातून नामवंत कवी/ शायर या कार्यक्रमांमध्ये सामील झाले होते हे विशेष. तसेच अनेक शैक्षणिक विषयावर चर्चासत्राचे सुद्धा आयोजन यावेळी करण्यात आले होते. यामध्ये संघटनेची पुढील रूपरेषा आखून राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना दिशानिर्देश राज्य अध्यक्ष एम.ए गफ्फार यांच्या वतीने देण्यात आले.

