Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रफुल्ल लोढा यांनी दिला आपादग्रस्तांना मदतीचा हात

Responsive Ad Here


जामनेर प्रतिनिधी

 जामनेर शहरासह तालुक्यातील पहुर , पिंपळगाव गोलाईत या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे  झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पहूर  येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा  यांनी आपातग्रस्तांना मदतीचा हात दिला .

       जामनेर तालुक्यात गेल्या पाच सात दिवसांपासून सकाळी पावसाने थैमान घातले होते .यात रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले , बहुसंख्य लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत . या पार्श्वभूमीवर माणुसकी धर्म पाळत पहूर पेठ येथील आरोग्य दूत प्रफुल्ल लोढा यांनी आपातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत जामनेर पुरा तसेच इंदीरा आवास , शास्त्री नगर , गोविंद बाबा भिल वस्ती तसेच मोहल्ला भागात तसेच पहूर येथे  अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या लोकांना फुल न फुलाची पाकळी म्हणून काही आर्थिक मदत प्रफुल्ल रायचंदजी लोढा सामाजिक कार्यकर्ते यांनी केली . यावेळी विलास पाटील , माजी तालुका युवक अध्यक्ष  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , जामनेर तालुकाध्यक्ष शैलेश पाटील ,किरण पाटील शरद पांढरे, अमोल पांढरे, दीपक खाटीक उपस्थित होते .

 मदत स्वीकारताना आपातग्रस्तांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते .