Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सायकल डे निमित्त.. आओ चले डबलसीट...!

Responsive Ad Here


 हिवरखेड प्रतिनीधी::जितेश कारीया


आज सकाळी रेडिओवर ऐकत असतांना  सोने की सायकल चांदी का सीट आओ चले डार्लिंग चले डबल सीट हे सायकल डे च्या निमित्त प्रसारित गीत ऐकण्यात आलं अन मन भूतकाळातल्या सायकलच्या युगात सर्रर्रर्रकन पोहचलं.

सायकलचा इतिहास शोधला तेव्हा लक्षात आलं की पहिली सायकल बनवली 1690 साली फ्रान्सच्या सिव्हर्क यांनी. तिला गती यावी म्हणून 1876 साली डॉ. लॉसन यांनी पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला. दरम्यानच्या काळात म्हणजे 1987 ला म्हणजे सायकलच्या जन्मापासून तीन दशकानंतर आमच्या कुटुंबात वडिलांनी सायकल विकत घेतली होती. आताच्या काळात ही सायकल टायरला गिअर जोडल्याने खूपच वेगवान झाली आहे. 


ऐंशीचे दशक संपण्याच्या काळी अकोल्याला बाहेती यांचे सायकलचे शोरूम होते. हिवरखेड येथील सायकल शॉप चालवणारे माझ्या वडिलांचे मित्र लक्ष्मणभाऊ म्हसाळ यांनी माझ्यासाठी हिरो जेट सायकल अकोल्यावरून मागवली होती. त्या काळात ज्यांच्याकडे सायकल नसायची ते सायकल शॉप वरून भाड्याने सायकल घेऊन चालवायचे. पुढे तेल्हारा किंवा अकोला शिक्षणासाठी जायचो तेव्हा हमखास सायकल भाड्याने घेऊन महाविद्यालयात डबलसीट आम्ही जात होतो. एका रजिस्टर वर सायकल दुकानदार नाव, गाव, वेळ लिहून,ओळख पटवून सायकल ताब्यात देत असत. आताच्या पिढीला तो काळ माहित सुद्धा नाही.


घरापासून शाळा दीड ते दोन किलोमीटर असल्याने शाळेत जायला व इतर वेळी वडिलांना शेतात जायला ही सायकल मदत करायची. सुरुवातीला पडत झडत कैची, दंडा, सीटवर बसून, कॅरी वर बसून, डबल सीट अशी सायकल चालवायला शिकलो. इयत्ता नववी दहावीत असताना बऱ्याचदा जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड येथे शिक्षक असलेले आमचे आतेभाऊ प्रवीण अढाऊ सर हे मला डबल सीट घेऊन जायचे.मित्रांना सोबत घेऊन डबलसीट सायकल चालवण्याचा मजा काही औरच असायचा. टोंगे फुटणे, खरचटने नित्याचेच असायचे. विद्यालयात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भले मोठे सायकल स्टॅन्ड होते. एक ते दीड हजार विद्यार्थी तेव्हा शाळेत शिकत होते. आपल्याजवळ सायकल आहे यात फार मोठेपणा वाटायचा. सायकल मुळे पर्यावरणाची सायकल, वैयक्तिक आरोग्य अबाधित राहत होते. वाशीम ला डी. एड. ला असतांना तेथे मी दुसरी हिरो रेंजर सायकल विकत घेतली होती. त्यानंतरच्या काळात मात्र सायकलचा वापर कमी होऊन पेट्रोल गाड्या आल्या आणि वैयक्तिक, सामाजिक, पर्यावरण पूरक ठरणारी सायकल मागे पडत गेली.

इयत्ता सहावीला सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ आहे. ह्या पाठातून लेकरांच्या मनात सायकल चालवण्याचे वैयक्तिक, सामाजिक व पर्यावरण विषयक फायदे चांगल्या प्रकारे रुजविल्या जातात. हा पाठ विद्यार्थ्यांना मी प्रात्यक्षिक घेऊन शिकवायचो. अनेक लेकरं या माझ्या तासिकेत पहिल्यांदा सायकल चालवणारे निघायचे. ही तासिका मी सुद्धा लेकरांच्या सोबत खूप एन्जॉय करायचो. काही दिवसापूर्वी आमचे पर्यावरण प्रेमी मित्र डॉ. नंदकिशोर चिपडे यांच्यासाठी सायकल विकत घ्यायला गेलो तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान असलेली गिअरची सायकल चालवली. खूपच अत्याधुनिक अशा सायकली बाजारात आहेत. त्यातील गिअर असणारी 35 हजार रुपये किंमतीची सायकल डॉ. चिपडे साहेबांनी घेतली. त्यांच्यासारखंच दैनंदिन जीवन जगतांना आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न चालवता प्रत्येकाने सायकल, पायी चालत किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर केल्यास,प्रदूषण कमी करण्यात मोठा हातभार लागू शकतो नि ही कृती प्रत्येकाने करणे स्वतःसाठी आरोग्यवर्धक ठरू शकते.