Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पर्यावरण संवर्धनासाठी करूया तीन 'ज' चे रक्षण

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनीधी::जितेश कारीया

    संपूर्ण जगभर ५ जून हा दिवस दरवर्षी 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. पर्यावरणाचे संवर्धन, समस्या निराकरण तसेच पर्यावरणाच्या गुणवत्तेत वाढ करणे व पर्यावरणविषयक निर्णय घेण्याचीक्षमता मानवात निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे ह्या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा केला जातो.सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरण या संज्ञेत वनस्पती व प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात वास्तव्यास असतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा पर्यावरणात समावेश होतो. 

    विसाव्या शतकाच्या अखेरीच्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना पाहता पर्यावरणातील बदलांची प्रक्रिया जलद होऊन बदलांचा वेगही खूपच वाढल्याचे दिसून येत आहे. पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढले. पृथ्वीच्या वातावरणाचे संरक्षक कवच असलेल्या ओझोन लेअरला भोके पडायला सुरुवात झाली. पर्यावरणाची होत असलेली ही हानी थांबवण्यासाठी प्रत्येक मानवाने पुढे येणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जल, जंगल आणि जमीन या तीन 'ज' च्या पर्यावरण त्रिसूत्रीचा गांभीर्याने मानवाने विचार करायला पाहिजे जल, जंगल आणि जमीन यांचं आपल्या जगण्यातून नुकसान होणार नाही यास्तव पर्यावरण पूरक जगण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे. ह्या अपेक्षेसह पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.तुळशिदास खिरोडकार