हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया
महात्मा फुले शिक्षण संस्था, हिवरखेड, संचालित सहदेवराव भोपळे विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल यावर्षी सुध्दा उत्कृष्ट लागला आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत एकूण 151विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यापैकी 147 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. 83 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 39 विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,22 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत,03 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची टक्केवारी 97.35 अशी आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून गुणानुक्रमे कु.अंजली राजेश टाले 95.40%,अनिमेश ब्रम्हदेव हागे 95%,प्रथमेश नथ्थु राहाटे 93.40%, प्रांजली दिलीप उगले93%,कु.तृप्ती रविंद्र बाजारे 92.40%,ओम गोपाल इंगळे 92.20%,सय्यदा लायबा फिरोजअली मिरसाहेब 91.60%,दिक्षा लक्ष्मण फोपसे 91.40%, वैष्णवी राजेश गावंडे 91.40%,यश दिनकर गावंडे91.40%,यश अशोक उगले 91%, प्राची सुरेश कोरडे 90.60%,चंचल संतोष नाठे 90.40,शिवम विजय वांढे 90.40%,जान्हवी नागोराव शेगोकार 90.20 टक्के गुण मिळवून बाजी मारलेली आहे.मराठी माध्यमातून गुणानुक्रमे कु. राधिका संजय वाकोडे - 90.80%,कु. साक्षी सुनिल नाठे - 90.20%,कु. समिक्षा जगदीश नराजे - 88.00%,कु. पुनम विनोद राहाटे - 87.00%, कु. किरण संतोष सावरकर - 87.00% ,कु. भाग्यश्री नरेश निमकर्डे - 85.60% ,कु. पुनम अरुण व्यवहारे - 85.60% ,कु. ज्योत्स्ना देवानंद डिगे - 84.60%
,कु. वैष्णवी संतोष भाकरे - 83.20% ,कु. गायत्री प्रकाश इखार - 83.20% ,चि. यश राजेश कट्यारमल - 82.80% , चि. हरिओम जगन्नाथ उगले - 82.60% ,कु. पुजा सुनिल वानखडे - 82.40%, कु. रिया मनिष बोबडे - 81.80%, चि. हरिओम प्रदीप भाकरे - 81.80%
,कु. सुश्मीता गणेश राठोड - 81.60% गुण मिळवले आहेत. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे,कार्यवाह श्यामशील भोपळे, तथा संस्थेचे समस्त संचालक,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी वालोकार,वर्गशिक्षक अभिजीत भोपळे, शाळेचे सर्व शिक्षक- कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
