Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडचा दहावीचा निकाल शंभर टक्के

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया 


हिवरखेड येथील सेंटपॉल अकॅडमी या शाळेचे एकूण 38 विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी 38 ही विद्यार्थी पास झालेले असून शाळेने आपल्या उज्वल यशाची व शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवलेली आहे. 38 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थी हे डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले असून चार विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये आले आहे. संपूर्ण शाळेमधून अlचल विजय हागे या विद्यार्थिनीने 96 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तनवी अनिल खिरोडकlर या विद्यार्थिनीने 95 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

आर्या संतोष गावंडे या विद्यार्थिनीने 94.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यश सारंगधर गावंडे या विद्यार्थ्याने गणित विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनीतजी लखोटीया सर ,संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरंजी डागा सर संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी सर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक चैतन्य खारोडे सर दहिसर, अमानकर सर, कातव सर, येलुकार मॅडम, बाजारे मॅडम यांना दिले आहे