अमळनेर: आज दि 27 जून 2023 रोजी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 149 जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.अशोक पवार सरांच्या नेतृत्वात युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे विचार प्रबोधन अभियान अंतर्गत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकाच दिवशी 100, ठिकाणी व्याख्यान देऊन राजर्षी शाहु महारांजाचे विचार पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरूड येथील शिक्षक अशोक पाटील यांनी लोकमान्य विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व अशोक पाटील सर यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन, जितेंद्र चौधरी व मनिषा खांजोडकर तसेच प्रमुख वक्ते अशोक पाटील सर मंचावर विराजमान होते. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय सूर्यवंशी यांनी केले.
