Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्यांच्या पीककर्ज वाटप संदर्भात आढावा बैठक संपन्न

Responsive Ad Here


                     कोणताही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू नये आ. राजेश एकडे

मलकापूर यावर्षीच्या खरीप कर्जवाटपासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. यावेळी बँकेतील अधिकारी, कर्मचारी कृषी कर्जासंदर्भात दिरंगाई करीत असून, येणाऱ्या विविध समस्यांचा पाढाच उपस्थित शेतकऱ्यांनी वाचला. त्यावर आ. राजेश एकडे यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरीत हा प्रकार बंद करा अन्यथा कारवाई सामोरे जा, असा इशारा दिला.

स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात २६ जून रोजी खरीप पीककर्ज वाटप आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. राजेश एकडे, तहसीलदार आर. यू सुरडकर, सहायक निबंधक महेश कृपलानी, तालुका कृषी अधिकारी एल. बी. सूर्यवंशी, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, लीड बँक मॅनेजर विजय वैद्य, डी. एम. चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँक कृषी शाखेत अनादर होतो, अपमान होतो, अशी व्यथा कथन केली. त्यावर आ. एकडे यांनी कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये, तसेच पीककर्जासाठी आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना बँक कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी, अशा सूचना राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्याला सन्मानाची वागणूक द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. एकडे यांनी दिला.