हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
श्री ज्ञान भास्कर सेवा समिती अकोला च्या वतीने गत २३ वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीचा पर्यटनाच्या माध्यमातून परिपूर्ण आनंद घेण्याच्या दृष्टीने तीर्थक्षेत्राच्या यात्रेचे आयोजन केल्या जाते , सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा माता वैष्णो देवी तीर्थयात्रेचे दिनांक २३l ५ते १l७ l२०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले होते तसेच ते निर्विघ्न व यथाविधी संपन्न झाले
यावर्षी यात्रेचा शुभारंभ दिनांक २३ l ५ ला अकोला येथून झाला त्यामध्ये शेगाव , अकोला , बडनेरा , अमरावती , नागपूर , चंद्रपूर आधी ठिकाणावरून तब्बल १७५ यात्रेकर सहभागी झाले होते त्यात प्रथम २४ आणि २५ तारखेला संपूर्ण दिल्ली दर्शन त्यामधे कुतुब मिनार , राष्ट्रपती व जुने आणि नविन संसद भवन , कर्तव्य पथ , राजघाट , लोटस टेम्पल , बिर्ला मंदिर आदी पर्यटन स्थळाला भेटी देल्या. तदनंतर महाभारताची युद्ध स्थळ कुरुक्षेत्र या ठिकाणी समग्र गीता पारायण आणि श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मुखारबिंदातून स्थान महात्म्य व संपूर्ण गीतेच्या ७०० श्लोकांचे सारांश रूपात प्रवचन झाले .
तर नंतर दिल्ली येथून कटरा येथे रेल्वेने जाऊन माता वैष्णव देवीचे दर्शन आणि विशेष म्हणजे ९० टक्के लोकांनी पायी गड चढून दर्शन घेतले हे विशेष. त्याचबरोबर भारतीय ऐक्याचे महान प्रतीक , प्रांतवादाच्या भिंती पुरत्या पाडून टाकीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन उत्तर हिंदुस्तानातील दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहचवून ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला एवढेच नाही तर देशीक, भाषिक आणि प्रादेशिक करून समाजाचा मन , मेंदू आणि मनगट मजबूत करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणारे संतचरित्राचे आद्यइतिहासकार , भगवान पंढरीनाथाचे प्रेम भंडारी संत शिरोमणी नामदेव महाराज यांची तपस्थली पंजाबातील घुमान या ठिकाणी सुद्धा यात्रेकरूंना दर्शनाचा योग आला .
तदनंतर भारत पाकिस्तानची सीमा वाघा बॉर्डर या ठिकाणी संध्याकाळी परेड पाहण्याचा सुद्धा आनंद पर्यटकांना घेता आला . एवढेच नाही तर शीख धर्माचे मुख्य तीर्थस्थळ अमृतसर येथील सुवर्ण मंदिर येथे दर्शनाचा तसेच लंगर मध्ये महाप्रसाद घेण्याचा योग सुद्धा घडून आला. दोन दिवस त्या ठिकाणी मुक्काम करून दिनांक ३१ l ५ ला एकादशीच्या पर्व काळावर परतीच्या प्रवासाची सुरुवात होऊन एक जूनला संपूर्ण पर्यटक रात्री उशिरापर्यंत आपल्या घरी सुखरूप पोहोचले . सदर्हू कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सर्वश्री हरी भक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज भालतिलक , पुरुषोत्तम वैराळे , हरीदास पाटील वाघ , मंगेश गावंडे , मंगेश वैराळे , ऋतिक म्हसाये , अजय म्हसाये , रोशन कराळे आदींनी अथक परिश्रम करून केले असे श्री विनोद राहाणे हे कळवितात.
