मात्र बिट अमलदारासह हिवरखेड पोलिसांचे हात ओले असल्याची चर्चा
हिवरखेड प्रतींनीधी
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगावं बु येथुन आकोट हिवरखेड खंडाळा, थोडा आखर,चिपी,गायरान,खैरखेडं, प्रीपी, तळेगावं, दानापूर,बेलखेड,अशा गावात खुलेआम गुटखा सपल्याय केला जातो, दिन दहाळे खुलेआम गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हे सांगण्याची गरज शिल्लक राहिलीच नाही अडगावं बिट अंमलदार यांचे तर हात धुण्याचा प्रकार आहेच त्याचं बरोबर हिवरखेड ठाणेदार यांचा सुद्धा आशीर्वाद असल्याचें बोलले जात आहे, या गुटखा माफियांचे हप्ते सुरू असल्याने ठाणेदार या माफियांच्या सांगण्यावरून किरोकळ व्यवसायिकांना अटक करून तुरुंगात रवानगी करतात,व या गुटखा माफियांना खुलेआम गुटखा विक्री करण्यासाठी रस्ते मोकाट करतात, हे पोलीसाच्या वागणूक वरून आम नागरिक चर्चा करीत आहेत,
या गुटखा माफियांन मुळे संवेदनशील गावात कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचा प्रकार घडून येऊ शकते त्यामुळे या गुटखा माफियांना व संबधित पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देने गरजेचे आहे,तात्काळ या अडगावं गुटखा माफियांनच्या मुसक्या आवरायला हव्या अशी मागणी सुजान नागरिक करीत आहेत,,
