जामनेर दि९
येथील बोहरा इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहामध्ये दुपारी बारा वाजता जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री,संजय दादा गरुड , श्री डि के दादा पाटील यांच्या नेतृत्वात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या समर्थनार्थ एकमताने पाठिंबा दर्शवण्यात आला .याप्रसंगी सर्वप्रथम तालुक्याभरातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांची पवार साहेबांच्या प्रती असलेली एक मुखी समर्थनाला नेते मंडळींनी देखील साथ दिली व शरद चंद्रजी पवार साहेबांना जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा दर्शविला. राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्याचे सत्ता नाट्य चालू आहे याचा जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसवर जामनेर विधानसभेवर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही असे संजय दादा गरुड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका ठेवून कोणी कुठेही गेलं तरी आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री .डि .के दादा पाटील यांनी व्यक्त केलं .तसेच पक्षाच्या या कठीण काळामध्ये संघटनेसोबत राहून संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची मतं प्रत्येकाने या ठिकाणी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाही सर्वात मोठा दुखावटा हा जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला झालेला आहे कारण 105 आमदार असूनही नऊ मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून आलेल्याच नेत्यांची आहेत असे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विलास भाऊ राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील तसेच तालुका युवक अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, श्री प्रदीप भाऊ लोढा श्री दत्ताभाऊ साबळे या सर्वांनी आपली मतं याठिकाणी मांडली.
या बैठकीला तालुकाभरातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते अनिल भाऊ बोहरा, श्री दिन आबा पाटील श्री राजू रामदास पाटील, शहराध्यक्ष माधव भाऊ चव्हाण ,युवक शहराध्यक्ष सचिन भाऊ बोरसे, संतोष भाऊ झाल्टे, विनोद भाऊ माळी ,जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील, दिव्यांग सेलचे अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष राजूभाऊ जेंटलमन , अनिस भाऊ पैलवान ,विश्वजीत मनोहर पाटील, प्रल्हाद बोरसे बाजीराव पाटील, कैलास अपार, सुरता भाऊ जोशी, मोहन चौधरी ,अबू आला शेख, इमरान भाई ,सर्व गटप्रमुख गण प्रमुख व बुथ प्रमुख इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
