सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समुहाचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी.
वाढदिवस म्हटला की तो येतो जल्लोष, विनाकार वायफळ खर्च, दिखाऊपणा, परंतु या सर्व गोष्टीला फाटा देत माणुसकी समूहातर्फे माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आरोग्यसेवक चेतन पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने सहा वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवून एक नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.
सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे चेतन पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने शासकीय रुग्णालय जळगाव येथे रुग्णांना शरीराची झीज भरून निघण्यासाठी कॅल्शियम आणि प्रोटीन प्रमाण असलेले बिस्किट वार्ड क्रमांक १३ मध्ये वाटप करण्यात आले. माणुसकी समूह आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहून नेहमीच रुग्णांना आरोग्याच्या बाबतीत सदृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी समाजसेवक सुमित पंडित, गजानन क्षीरसागर,चेतन पाटील,रमेश लिंगायत,वार्ड बॉय बापू ढाकणे ,जयेश सोनार , सिक्युरिटीगार्ड पंकज पाटील,उपस्थित होते.
