हिवरखेड (प्रतिनिधी) जितेश कारीया
स्थानिक सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २०२३-२४ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह तथा माजी मुख्याध्यापक श्यामशील भोपळे, प्राचार्या रजनी वालोकार, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत, प्रा.दुर्गा बोपले हे होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. वालोकार यांनी संस्थेच्या शैक्षणिक सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना देत, या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन केले. तसेच संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय होऊन शैक्षणिक विकास साधण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी परिचय सत्रामध्ये संस्था पदाधिकारी, प्राध्यापकगण, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा परिचय झाला. यावेळी प्रा. निलेश गिऱ्हे, प्रा. मयूर लहाने, प्रा. हरिविजय दुधे, प्रा. अमोल दामधर आदी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. निखील भड व आभारप्रदर्शन प्रा. अमोल दामधर यांनी केले.
