माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर येथे दाखविण्यात आले चंद्रयान-३ चे लाईव्ह प्रक्षेपण.
हिवरखेड जितेश कारीया
भारतासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आज भारताने चांद्रयान-3 चे उड्डाण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अंतराळयानाने उड्डाण केले. चांद्रयान 3 मध्ये सहाचाकी लँडर आणि रोव्हर आहे. रोव्हर चंद्रावर माती आणि दगडाचा अभ्यास करेल. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली की, भारत दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा जगातला पहिलाच देश ठरेल.
भारताची बहुचर्चित असलेले चांद्रयान- ३ ही मोहीम विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या मोहिमेची माहिती देऊन. माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर येथे चंद्रयान-३ लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल बोंडे,सावळे मॅडम, बाजारे मॅडम शिंगोकार मॅडम, सातारकर मॅडम,अमोल ताठे,नितीन वानखडे,विवेक ढोकणे, हर्षल सोळंके, वैभव काळबांडे राहुल गिऱ्हे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दादाराव रेडे उपस्थित होते
