पत्रकारांच्या वतीने शालेय साहित्य देऊन सत्कार
नांदगाव खंडेश्वर प्रदिप रघुते
नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील बहिण भावांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे त्याकरता या विद्यार्थ्यांचा पत्रकारांच्या वतीने शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला
ग्रामीण भागात अत्यंत छोट्या खेडेगावांमध्ये राहणाऱ्या रोहित रामेश्वर शेलारे व प्रवर्ता महेंद्र शेलारे या बहिण भावांनी महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नांदगाव खंडेश्वर तालुका च्या वतीने या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या विद्यार्थ्यांचे पालक तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मनोज मानकर जिल्हा उपाध्यक्ष अथर खान प्रदीप रघुते सचिव अमोल इंगोले प्रसिद्धी प्रमुख सागर सव्वा लाखे मनोज जैन पत्रकार श्याम शिंदे अक्षय मुके संजय मांडवधरे संतोष ओके नरेंद्र लांजेवार संदीप अंभोरे अरुण बनकर सतीश देशमुख अंकुश निम्नेकर अनिल बारसे गणेश पाटोळे शिवदास उके अमोल दांडगे इत्यादी पत्रकार उपस्थित होते
