हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
स्थानिक हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात आले. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंनी केले विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व जाणीव व्हावी यासाठी सेंटपॉल अकॅडमी ने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू देऊन स्वागत तर केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय राहावा यासाठी त्यांच्या हाताला कलर लावून त्यांच्या हाताचे ठसे पानावर घेऊन ती पाने विद्यार्थ्यांना देण्यात आली शाळेचा पहिला दिवस हा त्यांच्यासाठी आठवण म्हणून राहावा विद्यार्थ्यांसाठी शाळा किती महत्त्वlची असते हे त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर लक्षात राहावे यासाठी शाळेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला ही संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर यांच्या विचारातून समोर आली.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सेल्फी स्टॅन्ड सुद्धा ठेवण्यात आलेला होता जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळा किती नावीन्यपूर्ण असते व शाळेत शिक्षणा व्यतिरिक्त किती कुतूहलपूर्वक व नाविन्यपूर्ण गोष्टी असतात त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल आस्था आणि प्रेम निर्माण व्हावा हा हेतू यामागे होता. त्याचबरोबर शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव सुद्धा अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे कुमकुमतिलक शाळेच्या उपमुख्याध्यापक निमितl गांधी मॅडम यांनी केले तर चंद्रकांत तिवारी सर यांनी विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीतजी लखोटिया सर, लुणकरनजी डागा सर तसेच संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर यांनी अभिनंदन व स्वागत केले.
